Breaking News

बलवडी येथील मा. चेअरमन अशोक खुळपे यांचे निधन


 

नाझरे प्रतिनिधी 

      बलवडी ता. सांगोला येथील सोसायटीचे माजी चेअरमन व माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक प्रल्हाद खुळपे यांचे शुक्रवार दिनांक 23 मे रोजी सकाळी आठ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूप्रसंगी त्यांचे वय वर्षे 64 होते. 

     त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम रविवार दिनांक 25 मे रोजी सकाळी साडेसात वाजता बलवडी येथे होईल असे नातेवाईकांनी सांगितले.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत