अनकढाळ येथील राजाबाई बंडगर यांचे निधन..
नाझरे प्रतिनिधी
अनकढाळ ता. सांगोला येथील रहिवाशी व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते कै. हनुमंतराव बंडगर यांच्या सुविद्य पत्नी राजाबाई हनुमंतराव बंडगर यांचे सोमवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूप्रसंगी त्यांचे वय वर्ष 69 होते.
त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम बुधवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता अनकढाळ येथे होईल असे नातेवाईकांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत