Breaking News

सांगोला तालुका वृत्तपत्र विक्रेत्यांची बैठक संपन्न


 

सांगोला प्रतिनिधी 

      सांगोला तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे यांच्या अध्यक्षतेखाली सांगोला येथे संघटनेची बैठक संपन्न झाली. 

    ऊन, वारा, पाऊस, कोरोना काळात व आता युद्धजन्य परिस्थितीत ही वृत्तपत्र विक्रेते सर्वांना पेपर देण्याचे काम करीत आहेत परंतु त्यांच्या अडीअडचणी सुटत नाहीत व यासाठी कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी लवकर व्हावी व संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग मेढेकर, मा. कोषाध्यक्ष गोरख भिलारे, सचिव बंटी बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण व शहरी सर्वांना सरसकट 30 टक्के कमिशन लवकर मिळावे याबाबत प्रयत्न सुरू आहे व न मिळाल्यास सर्वांनी संघर्ष करण्यास तयार राहावे असे आवाहनही रविराज शेटे यांनी केले. 

     यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष अमोल बोत्रे, सचिव उत्तम चौगुले, सदस्य सिताराम गेजगे, रफिक पठाण, रेवणसिद्ध नकाते, भानुदास जाधव, बाबुराव पवार, संतोष बनसोडे, डोंगरे, प्रणव राज शेटे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत