मंगळवेढा तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या अध्यक्षपदी विजय भगरे
मंगळवेढा (प्रतिनिधी) :
मंगळवेढा तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या अध्यक्षपदी विजय सुरेश भगरे यांची सर्वानुमते निवड झाल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे सदस्य व सांगोला तालुका वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे यांचे अध्यक्षतेखाली व सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सदस्य सिद्धेश्वर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीस मंगळवेढा तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या अध्यक्षपदी विजय सुरेश भगरे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. यावेळी संघटनेच्या उपाध्यक्षपदी विलास माने, भोसे, सचिवपदी बाळासाहेब नागणे, मंगळवेढा, खजिनदारपदी अहमद शेख, सिद्धापूर तर सदस्यपदी महादेव खुळे, पाठखळ, हुकुम मुलाणी,भाळवणी, श्रीकांत सांगोलकर, रड्डे, दिनकर ताड, निंबोणी, असलम मुलाणी, हुन्नूर, माणिक घुले, मरवडे, गुरू माळी, सलगर, मुकेश कनशेट्टी, हुलजंती, नितीन कोरे, बोराळे यांची निवड करण्यात आली. यावेळी रेवणसिद्ध नकाते, भानुदास जाधव, बाबुराव पवार, प्रणवराज शेटे आदि विक्रेते उपस्थित होते.
रविराज शेटे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना लोक कल्याणकारी महामंडळाच्या योजना लवकरच अंमलबजावणी होणार आहे. तरी संघटनेच्या सर्व सभासदानी संघटनेमध्ये जास्तीत जास्त सभासद होवून याचा लाभ घ्यावा असे आवाहन सांगोला तालुका वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे तालुकाध्यक्ष रविराज शेटे यांनी सांगितले. तसेच संघटनेच्या अडीअडचणी बाबत संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग मेडेकर, मार्गदर्शक गोरख भिलारे, सचिव सचिन बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे कामकाज उत्तम प्रकार सुरू आहे व याबाबत सर्व विक्रेत्याना शहरी व ग्रामीण भेदभाव न करता 30 टक्के कमिशन लवकरच मिळेल व न मिळाल्यास संघर्षासाठी तयार रहा असे आवाहन शेटे यांनी केले.
यावेळी सिद्धेश्वर सावंत म्हणाले की,मंगळवेढा तालुक्यात वृत्तपत्र विक्रेता संघटना नसल्यामुळे विक्रेत्यांची अडचण मोठया प्रमाणात असून त्यांना वाली कोणी नव्हता. त्यांनी आज मंगळवेढा तालुक्यात वृत्तपत्र विक्रेता संघटना निर्माण करून सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटना मध्ये सहभागी होवून इथुन पुढे विक्रेत्याना कोणतीही अडचण येणार नाही असे सिद्धेश्वर सावंत यांनी सांगितले. या वेळी सर्वांचे आभार बाळासाहेब नागणे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत