बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात मिष्टान्न भोजन
पंढरपूर विशेष प्रतिनिधी:डॉ अमोल उबाळे
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर येथे मिष्टान्न भोजनाचे नियोजन वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी यांनी केले, कार्यक्रमाच्या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बाळासाहेबांनी वाढदिवसासाठी केक, हार, फुले, फटाके यासाठी पैसा खर्च न करता तोच पैसा निधी जमा करून गोरगरीब जनतेच्या कार्यासाठी तसेच शैक्षणिक कामासाठी वापरावा व व सामाजिक कार्य करण्यासाठी बांधील राहावे असे आवाहन केले कार्यक्रमाप्रसंगी दीपक माने ,कैलास होवाळ, , मोहम्मद रफी मुलानी,, दीपक भोसले, बाबुराव सातपुते,गणेश बाबर लिंगेश्वर सरवदे, रवी खरे, सनी गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे महासचिव कैलास होवाळ यांनी केल, तर आभार तालुका संघटक मोहन वाघमारे यांनी मानले
तसेच कार्याध्यक्ष सोमनाथ गायकवाड, नेते विक्रम चंदनशिवे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे, महासचिव महेश रणदिवे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत