Breaking News

डॉ. ऋतुजा गोडसे हिस छत्रपती शाहू महाराज कॉलेजच्या पदवी समारंभात एमबी बीएस पदवी प्रदान... आई.. वडिलांचे स्वप्न पूर्ण.


नाझरे प्रतिनिधी 

       राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या भव्य पदवी समारंभात डॉक्टर ऋतुजा सुनिता विजय गोडसे नाझरे ता. सांगोला यांची प्रतिष्ठित एमबीबीएस पदवी प्रदान करण्यात आली आहे. हा सन्मान वैद्यकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अनिता परितीकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रा. विजय गोडसे व सौ. सुनिता गोडसे हे शिक्षक पती-पत्नी उपस्थित होते. 

        ऋतुजा गोडसे हिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाझरे, माध्यमिक शिक्षण श्रीधर कन्या प्रशाला व ज्युनिअर कॉलेज नाझरे तर अकरावी व बारावी ए. डी . जोशी कॉलेज सोलापूर येथे झाले. तिने आपल्या यशाचे श्रेय प्राध्यापकाचे मार्गदर्शन व कुटुंबाच्या अविरत परिश्रमास दिले.सदरच्या यशाबद्दल ऋतुजा गोडसे यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत