बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षम होते : सरपंच अनिता पवार......! आदर्श ग्रामसंघ महिला बचत गट यांच्या वतीने अजनाळे येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.....!
सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:
डाळिंबाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख निर्माण केलेल्या अजनाळे गावात २२ महिला बचत गट कार्यरत असून या महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी मोठी आर्थिक क्रांती केली आहे.महिलांना बँकेमार्फत कर्ज पुरवठा केला जातो या कर्जामधून महिलांनी उद्योग व्यवसाय चालू केला तर गावचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.अजनाळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महिलांना उद्योग व्यवसाय आधारित प्रशिक्षण दिले जाणार आहेत या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांची प्रगती होणार आहे. या महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षम होणार असल्याचे मत अजनाळे गावच्या विद्यमान सरपंच अनिता पवार यांनी व्यक्त केले.
काल शनिवार दिनांक २१ मार्च २०२५ रोजी दुपारी २ वाजता ग्रामपंचायत सभागृह अजनाळे येथे आदर्श ग्रामसंघ महिला बचत गट यांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रम प्रसंगी सरपंच अनिता पवार, ग्रामपंचायत अधिकारी संदिप सरगर, बँक ऑफ इंडिया शाखा व्यवस्थापक अविनाश रुपनर, उमेद व्यवस्थापक बाळासाहेब अवताडे, सरिता चौंडे, अश्विनी येलपले, महेश साठे, मनोज जाधव, पत्रकार सचिन धांडोरे,चैत्राली भंडगे, काजल बनसोडे, ग्रामसंघ अध्यक्षा मयुरी येलपले, निता कदम, रुक्मिणी धांडोरे, वैशाली धांडोरे, लता धांडोरे, सविता धांडोरे, शारदा गोयकर, जयश्री बोरकर, करुणा धांडोरे यांच्यासह बचत गटातील अध्यक्ष उपाध्यक्ष ,सचिव व बचत गटातील सर्व महिला मोठ्या संख्येने हजर होत्या.
पुढे बोलताना सरपंच अनिता पवार म्हणाल्या की,महिलांनी जर एखांदी गोष्ट ठरवली तर महिला काही पण करु शकते सरपंच पदापासुन ते राष्ट्रपती पदापर्यंत महिला आहेत महिला सक्षम झाल्या तर समाजाचा, गावाचा, तालुक्याचा विकास होण्यासाठी मदत होणार आहे. महिलांनी थकित पाणीपट्टी, घरपट्टी भरुण ग्रामपंचायतीस सहकार्य करावे असे असे आव्हान यावेळी त्यांनी केले.या वेळी संदिप सरगर, अविनाश रुपनर, महेश साठे यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार काजल बनसोडे यांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत