Breaking News

संविधान अमृत महोत्सवातील ढिसाळ अंमलबजावणीविरोधात मंगळवेढ्यात NDMJ कडून नायब तहसीलदारांना निवेदन


 मंगळवेढा : नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (NDMJ) या सामाजिक संघटनेतर्फे मंगळवेढा नायब तहसीलदार शुभांगी जाधव यांना संविधान अमृत महोत्सवाची अंमलबजावणी न करणाऱ्या शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांच्या सहीने 18 नोव्हेंबर 2025 रोजी जारी झालेल्या शासन निर्णयानुसार 26 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत संविधान अमृत महोत्सवातील सर्व कार्यक्रम शासकीय कार्यालये, ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था तसेच सर्व शाळांमध्ये दररोज राबवणे बंधनकारक आहे. मात्र अनेक ठिकाणी या आदेशाचे पालन होत नसल्याने संबंधित अधिकार्‍यांवर लगेचच कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी NDMJ ने केली.

या वेळी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मा. येताळा खरबडे, सुरेश मरीआईवळे, गोपाळ आईवळे तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत