इवलेसे रोप लाविले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी"..ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली पठाडे महाराज..! बलवडी येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न...
नाझरे प्रतिनिधी
समाजात अधर्म वाढत चालला असून, यासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या विचारांची गरज असून त्यांचा आदर्श घेऊन युवकांनी संघटित व्हावे व संगत करताना चांगल्याची करा व निर्वसनी रहा व स्वतःच्या मनगटावर जगा तसेच पैशासाठी नाती तोडू नका व आज गरिबाच्या घरी मिळेना भाकर व श्रीमंतांच्या घरी साखर अशी अवस्था झाली आहे. व यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर, जिजामाता यांचा आदर्श सर्वानी घ्यावा, व बलवडी येथे यंदा सप्ताहाचे 38 वे वर्ष असून, इवलेसे रोप लाविले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी असे झाले आहे व यामध्ये राहुल महाराज प्रवीण दादा व कारंडे सर तसेच सर्व ग्रामस्थांचे योगदान मोठे आहे असे काल्याच्या कीर्तनाप्रसंगी ह भ प ज्ञानेश्वर माऊली पठाडे महाराज यांनी सांगितले.
तसेच मुला, मुलींनी आई-वडिलांची काळजी घ्या व त्यांना मान खाली घालावी लागेल असे करू नका व पालकांनी मुलगा व मुलगी असा भेदभाव करू नये. सध्या पुरुष आज आपण पती आहात परंतु महिला राष्ट्रपती आहेत याचा अभिमान बाळगा व माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी मोठ्या पदावर काम करताना कधीही डोक्यावरचा पदर पडू दिला नाही परंतु सध्या जास्त शिकलेले धर्म मानित नाहीत व यामुळे अधर्म वाढतो व यासाठी संताच्या विचारांची गरज आहे व देवास जन्म घ्यावा लागतो. व गावात मंडळ जरूर असावे व त्याचे संघटन असावे व याचा उपयोग सर्वांना व्हावा, राजकारणाच्या वेळी राजकारण करा व इतर वेळी समाज कार्य करा असा मौलिक सल्लाही पठाडे महाराज यांनी यावेळी दिला.
सदर प्रसंगी उत्कृष्ट रांगोळी बद्दल महिला वर्गाचा सत्कार मा. सरपंच विजय दादा शिंदे यांच्या शुभहस्ते तर शेवटच्या दिवशीचा महाप्रसाद उद्धव क्षीरसागर व सौ. छाया क्षीरसागर, नवनाथ क्षीरसागर, अविनाश शिरसागर, यांनी दिल्याबद्दल डॉक्टर शिवाजीराव ढोबळे, सरपंच ज्ञानेश्वर राऊत, दत्तात्रय कारंडे व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला. तसेच यावेळी गावातील सर्वांनी वेगवेगळी सेवा दिली त्याबद्दल त्या सेवेकरांचा सत्कार पठाडे महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी विठू माऊली वारकरी शिक्षण संस्था दिघंची राहुल महाराज फडतरे यांनी साथ दिली. शेवटी सर्वांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत