वाकी घेरडी येथील सुभद्रा शिंदे यांचे निधन..
सांगोला प्रतिनिधी
शिंदे वस्ती वाकी घेरडी ता. सांगोला येथील श्रीमती सुभद्रा श्रीरंग शिंदे यांचे शनिवारी दि. 13 डिसेंबर रोजी पहाटे चार वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूप्रसंगी त्यांचे वय वर्ष 95 होते. प्राचार्य बाळासाहेब शिंदे यांच्या त्या मातोश्री होत्या.
त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम सोमवार दि. 15 डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता शिंदे वस्ती वाकी घेरडी येथे होईल असे नातेवाईकांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत