सरपंच अश्विनीताई बंडगर यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकारांना जॅकेट वाटप .
विशेष प्रतिनिधी , संतोष कदम.
भिगवन :- मदनवाडी ता.इंदापूर येथील लोकनियुक्त सरपंच सौ.अश्विनीताई बंडगर व त्यांचे पती उद्योजक नानासाहेब बंडगर यांच्या कुटुंबाला सामाजिक जनसेवेचा वारसा असून ते आजही वारसा पुढे नेत आहेत.हे कुटुंब आजही निस्वार्थपणे सामाजिक बांधिलकी जपत आहेत.त्यांचा भिगवण परिसरातील अनेक गोरगरीब कुटुंबांना,व त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी मोठा आधार असून ते शिक्षण,मंगल कार्यालय,शासकीय योजना, ग्रामपंचायत,आणि स्वखर्चाने आजही त्यांचे जनसेवेचे काम अतिशय कौतुकास्पद चालूच आहे.
त्यांचे पती उद्योजक नानासाहेब बंडगर हे त्यांच्या प्रेमळ स्वभावाने आणि निस्वार्थ सामाजिक बांधिलकी जपत असल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत,त्यांचा सामाजिक आणि राजकीय आलेख हा मोठ्या प्रमाणात वाढत चालला असून त्यांनी अगदी थोड्या कालावधीतच भिगवण-शेटफळगडे जिल्हा परिषदेच्या गटामध्ये व भिगवण परिसरात मोठ्या प्रमाणात नावलौकिक मिळविला आहे. त्यामुळे नानासाहेब बंडगर हे सर्वसामान्य जनतेला "आपला हक्काचा माणूस" वाटतो.
तसेच महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे ते विश्वासू सहकारी मानले जात आहेत. त्यांच्या या निस्वार्थी आणि प्रेमळ स्वभावामुळे भिगवण-शेटफळगडे जिल्हा परिषद गटाची जागा जरी सर्वसाधारण असली तरी लोकांच्या पसंतीचा विचार करता त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
सरपंच अश्विनीताई बंडगर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी इंदापूर तालुक्यातील जनसेवा पत्रकार संघटनेच्या पत्रकारांना जॅकेट वाटप केले.
जनसेवा पत्रकार संघटनेचे पत्रकार यांच्या कार्याची आणि कामाची दखल घेऊन सरपंच अश्विनीताई बंडगर यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त वीस पत्रकारांना जॅकेट वाटप करून त्यांचा सन्मान केला.
तसेच जनसेवा पत्रकार संघटनेच्या वतीने सरपंच अश्विनीताई बंडगर व त्यांचे पती नानासाहेब बंडगर यांचा देखील सन्मान जनसेवा पत्रकार संघटनेच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय मिसाळ व गिता दराडे यांनी केला.
व्यंकटेश लॉन्स भिगवण येथे, सरपंच अश्विनीताई बंडगर, उद्योजक नानासाहेब बंडगर, आणि जनसेवा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष बबनराव धायतोंडे, उपाध्यक्ष दत्तात्रय पारेकर, कार्याध्यक्ष अतुल सोनकांबळे, खजिनदार अरुण भोई, प्रसिद्धीप्रमुख प्रवीण पिसे, महिला पत्रकार गीता दराडे व पत्रकार संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत