Breaking News

राज्यस्तरीय ‘ATS प्रज्ञाशोध’ परीक्षेत पायोनियर शैक्षणिक संकुलाचा डंका...! अमन होळकर व सानवी मिसाळ यांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरव


मंगेवाडी, दि. २९ ऑगस्ट २०२६ (प्रतिनिधी) : खंडोबा बहुउद्देशीय संस्था संचलित पायोनियर शैक्षणिक संकुल, य. मंगेवाडी येथील विद्यार्थ्यांनी महर्षी वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ, वैराग यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ए.टी.एस. (ATS) प्रज्ञाशोध परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा गुरुवार, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता संकुलात उत्साहात पार पडला.

या राज्यस्तरीय परीक्षेत होळकर अमन सुनील याने केंद्र पातळीवर १५२ वा, जिल्हा पातळीवर ४ था आणि राज्य पातळीवर १५ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच मिसाळ सानवी संदिप हिने केंद्र पातळीवर १३८ वा, जिल्हा पातळीवर ५ वा आणि राज्य पातळीवर २२ वा क्रमांक मिळवून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले.

या गौरवशाली यशाबद्दल आयोजित विशेष सन्मान समारंभात गुणवंत विद्यार्थी अमन होळकर व सानवी मिसाळ यांचा पायोनियर शैक्षणिक संकुलचे संस्थापक-अध्यक्ष मा. अनिल येलपले सर, संस्थेच्या सचिवा सौ. मनीषा येलपले मॅडम, पायोनियर इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य मा. सतीश देवमारे सर तसेच पायोनियर निवासी गुरुकुलचे प्राचार्य मा. सोमनाथ आदलिंगे सर यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपनर सर यांनी केले. यावेळी संकुलातील शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या यशाचे कौतुक केले.

यावेळी पायोनियर शैक्षणिक संकुलचे संस्थापक-अध्यक्ष मा. अनिल येलपले सर यांनी अमन होळकर व सानवी मिसाळ या गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत