Breaking News

राज योगी रंगनाथ स्वामी महाराजांचे धर्मरक्षणाचे कार्य मोठे..- ह.भ.प. वंदनाताई कापरे देशपांडे..! नाझरे येथे राजयोगी रंगनाथ स्वामी महाराज यांचा जन्मदिन व पुण्यतिथी सोहळा संपन्न..


नाझरे प्रतिनिधी 

       नाझरे ता सांगोला येथे राजयोगी रंगनाथ स्वामी यांचा जन्मदिन व पुण्यतिथी सोहळा श्री रंगनाथ श्रीकृष्ण दीक्षित सेलूकर महाराज यांच्या आशीर्वादाने मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला. राजयोगी रंगनाथ स्वामींनी धर्मरक्षणासाठी घरदार सोडले व बारा वर्षे तपश्चर्या करून श्री दत्तगुरूंनी त्यांना दर्शन दिले तसेच महाराज यांनी वाटचाल करीत असताना टिहरी गावी श्रद्धावान राजाने त्यांना भरजरी पोशाख, आभूषणे, तलवार, ढाल, भाला व मनोहर घोडा देऊन आदर सत्कार केला व त्यापासून त्यांचे नाव राजयोगी रंगनाथ स्वामी असा उल्लेख झाला. 

   तसेच बारा वर्षानंतर रंगनाथ स्वामी पंढरपूरला आले व नित्यनेमाप्रमाणे त्यांचे वडील बोपाजी पंत व आई बयाबाई या पण पंढरीच्या वारीत आल्या होत्या योगायोगाने कीर्तन सोहळ्यास मंदिरात सुरुवात झाली, भक्तीरसात श्रोते रंगून गेले व बयाबाईंना रंगनाथाचा आवाज ऐकला व किर्तन झाल्यानंतर भेट झाली यावेळी आई मीच तुझा बाळ रंगनाथ आहे असे म्हणून आई-वडिलांना नमस्कार केला,


 सर्वांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या व प्रभुनामाचा जयघोष झाला व ज्यांनी हा सोहळा पाहिला ते कृतार्थ झाले व त्यानंतर नाझरे येथे आले तसेच त्यांनी अनेक वर्षे निगडी येथे वास्तव्य केले. नाझरे हे त्यांचे जन्मगाव तर बराच कार्यकाळ निगडी येथे गेला, अशा या संताच्या विचाराची आज ही गरज आहे असे वंदनाताई कापरे यांनी यावेळी सांगितले. यानिमित्त शोभा यात्रेचे नियोजन करण्यात आले होते. तसेच सेलूकर महाराज यांच्या आशीर्वादाने विष्णू याग सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते. तसेच दिंडी प्रदक्षिणा व महाप्रसाद वाटप करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत