मानवता दिनानिमित्त सांगोला पोलीस निरीक्षक विनोद गुघे यांचा सत्कार
सांगोला प्रतिनिधी
काल सांगोला तालुक्याचे पोलीस निरीक्षक विनोद गुघे साहेब यांचा मानवता दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने सार्वभौमिक मानव अधिकार संघटना यांच्या वतीने त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. सामाजिक बांधिलकी, मानवाधिकारांची जाणीव आणि लोकाभिमुख पोलीस प्रशासन यासाठी त्यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यानंतर पोलीस निरीक्षक विनोद गुघे साहेब यांनी कोळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थी विहार येथे भेट देऊन पाहणी केली. त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थींना अभिवादन करून नतमस्तक होऊन श्रद्धांजली अर्पण केली. संविधानिक मूल्ये, मानवता आणि सामाजिक समतेचा संदेश बाबासाहेबांच्या विचारांतून मिळतो, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
कोळा येथे असलेल्या मोठ्या व प्रशस्त लायब्ररीला देखील त्यांनी भेट दिली. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधत त्यांच्या अभ्यासपद्धती, अडचणी व भविष्यातील उद्दिष्टांबाबत माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा ऐकून त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच “लवकरच पुन्हा भेट देऊन विद्यार्थ्यांशी सविस्तर चर्चा करू,” असे आश्वासन दिले.
या भेटीमुळे परिसरातील नागरिक, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत