Breaking News

जंक्शन एमआयडीसीच्या विकासासंदर्भात उद्योग मंत्र्यांच्या दालनात बैठक....! एमआयडीसी लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याचे मंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश.....!


 प्रतिनिधी , संतोष कदम

इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथे नव्याने मंजूर झालेल्या औद्योगिक क्षेत्राच्या (एमआयडीसी) विकासासंदर्भात मंत्रालय, मुंबई येथे उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीदरम्यान जंक्शन एमआयडीसीच्या तातडीच्या विकासावर भर देत, आराखडा तयार करणे, डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करणे, तसेच औद्योगिक प्लॉटिंग, रस्ते, पाणी, वीज आणि इतर मूलभूत सुविधा विकसित करण्याबाबत मंत्री भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.


एमआयडीसी लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या बैठकीला संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व एमआयडीसीच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.

औद्योगिक विकासास गती देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असून, यामुळे स्थानिक रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत