य. मंगेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी शेकाप- शिवसेना गटाच्या शितल भडंगे यांची बिनविरोध निवड
सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:
य मंगेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी शेकाप -शिवसेना गटाच्या शितल सचिन भडंगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर शेकाप -शिवसेना गटाच्या समर्थकांनी फटाक्याची आतिश बाजी करत गुलालाची मुक्त उधळण करत जल्लोष केला.
तात्कालीन राष्ट्रवादी गटाच्या सरपंच प्रीती बापू जावीर यांच्यावर अविश्वास ठराव आणून सरपंच पदाची जागा रिक्त करण्यात आली होती. नाझरे मंडल अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी हरिश्चंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक झाली.या वेळी शितल सचिन भडंगे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. याप्रसंगी ग्राम महसूल अधिकारी सूर्यवंशी, ग्रामपंचायत अधिकारी शिंदे, अमोल पाटील, शशिकांत येलपले, अमोल खरात, प्रकाश सोळशे, दत्ता मासाळ, लक्ष्मण येलपले, आप्पा कोकरे, प्रकाश पाटील, बाळू (आप्पा )येलपले, आशिष येलपले, अमोल येलपले, रणजीत पाटील, रोहित येलपले, मधुकर भडंगे, सत्यवान घाटुळे, शिवाजी घाटुळे, धर्मराज हागीर, भारत हागीर, दीपक घाटुळे, बाळकृष्ण कोकरे, रमेश चोरमले, परमेश्वर केंगार, विकास येलपले, सचिन येलपले, नितीन धनवडे, प्रज्योत काटे, गणेश लोखंडे, सचिन खरात , उपसरपंच अनिल पाटील, शैला येलपले, नंदाताई चोरमले, विमल खरात, सुप्रिया पाटील, मनिषा घाटुळे, कैलास येलपले, मुक्ताबाई चोरमले,यांच्यासह अन्य मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत