नाझरे परिसरात गरिबाच्या फ्रिजला वाढती मागणी
नाझरे प्रतिनिधी:
नाझरे ता. सांगोला व परिसरात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, उन्हाळ्यात तहान भागावी म्हणून फ्रीज, जार याचा वापर वाढत चालला असून, परंतु कुंभार वाड्यात गरिबाचा फ्रिज बनवण्याच्या कामालाही वेग वाढत चालला आहे. तसेच फ्रिज व जार मधील पाण्यापेक्षाही माठातील पाण्याची चव गोड लागत असल्याने नागरिक माठाला पसंती देत असून, माठ खरेदीत भर पडत चालली आहे.
माठाला गरीबाचा फ्रिज म्हणून संबोधले जाते. नाझरे गावात आज ही पारंपारिक पद्धतीने कुंभार वाड्यात माती पासून मोठ्या प्रमाणात माठ बनवण्याचे काम कुंभार वर्ग करीत असून, फ्रिज व जार मधील पाण्याची चव वेगळीच परंतु माठातील पाण्याची चव गोड व माठातील थंड पाण्याचा त्रास होत नसल्याने आजही माठाची अस्तित्व टिकून आहे. सध्या उन्हाळा सुरू झाल्याने थंड पाण्यासाठी माठ खरेदीसाठी कुंभारवाड्यावर व बाजारात गर्दी होत आहे. घरात फ्रिज, जार असूनही अनेक नागरिक घरात माठ ठेवतात परंतु सध्या मेहनत घेऊनही कमी उत्पन्न मिळते त्यामुळे नवीन पिढी यामध्ये यायला तयार नाही. कुंभार वाड्यात सौ सुनीता तेली, अमीर उर्फ बंडू शेख, राजू काझी, आबा पवार इत्यादी नागरिक व महिला माठ खरेदी करताना दिसत होती.
माठ व्यवसाय अडचणीत
सध्या मार्ट तयार करण्यासाठी लागणारी माती महाग झाल्याने माठाच्या किमती वाढले आहेत व माठ तयार करण्यासाठी मी, माझा मुलगा महेश, सून सोनाली व पत्नी सौ सुनीता कुंभार एवढे जण राबवत आहोत परंतु कष्टाच्या मानाने पैसे मिळत नाहीत, व मातीच्या दरामुळे व्यवसाय अडचणीत आला आहे.
सुधाकर कुंभार... माठ विक्रेते
___________________________
माठातील पाणी आरोग्यास चांगले..
मातीच्या माठात पाणी साठवल्याने ते शुद्ध तर होतेच व नैसर्गिक रित्या थंड ही राहते तसेच माठातील पाणी पिल्याने घशाचे रोग होत नाही, पचनशक्ती सुधारते व त्यामुळे माठातील पाणी आरोग्यास फायदेशीर ठरते
मा. आबा पवार.(सामाजिक कार्यकर्ते)
____________________________


कोणत्याही टिप्पण्या नाहीत