सांगोला तालुका वृत्तपत्र विक्रेत्याच्या बैठकीचे आयोजन
सांगोला प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांची महत्त्वाच्या विषयावर विचार विनिमय करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक 26 मार्च रोजी बोत्रे कॉम्प्लेक्स एसटी स्टँड समोर भोपळे रोड येथे दुपारी एक वाजता बैठकीचे आयोजन केले असल्याचे संघटनेचे उपाध्यक्ष अमोल बोत्रे यांनी सांगितले.
सदर बैठकीत वृत्तपत्र विक्रेत्याच्या अडीअडचणी व इतर महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे तरी सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे सचिव उत्तम काका चौगुले यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत