Breaking News

०८ मार्च २०२५

राजे शिवाजी सैनिकी पॅटर्न स्कूल अनकढाळ मध्ये महिला दिन उत्साहात साजरा



सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:

   अनकढाळ येथील राजे शिवाजी सैनिकी पॅटर्न स्कूल आणि ज्युनियर कॉलेज मध्ये जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

      संस्थेच्या संचालिका सौ.नकूसा कोकरे मॅडम यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.

      यावेळी महान महिला व्यक्तिमत्वाच्या कार्याची ओळख विद्यार्थांना करून देण्यात आली.

   शाळेतील मुलींनी महान महिला व्यक्तिमत्वाच्या वेशभूषा केल्या होत्या. त्यामध्ये अनुश्री कडलासकर, गौरी बुरुंगले , रुकया नदाफ, मेघा खांडेकर, दिशा कुटे, श्रध्दा बंडगर आणि सलोनी बंडगर इत्यादी मुलींनी आकर्षक वेशभूषा करून महिला दिनानिमित्त सुंदर भाषण केले.

      यावेळी सर्व महिला शिक्षकांचा तसेच  शाळेच्या मेस मधील महिला कर्मचाऱ्यांचा  देखील विशेष सत्कार करण्यात आला.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली कापसे मॅडम यांनी केले.सविता श्रीखंडे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.संगीता इंगोले मॅडम यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षांची निवड केली त्याला अनोमदन शितल मिसाळ मॅडम यांनी दिले तर विद्याश्री पाटील मॅडम यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा