Breaking News

०७ मार्च २०२५

जागतिक महिला दिन विशेष...! अजनाळे ग्रामपंचायतीच्या विद्यमान उच्चशिक्षित सरपंच अनिता चंद्रकांत पवार


 


आदिशक्ती तू, 

प्रभूची भक्ती तू, 

झाशीची राणी तू 

मावळ्यांची भवानी तू ,

प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू ,

आजच्या युगाची  प्रगती तू 

प्रतिभेला तुझ्या नवे पंख मिळू दे,

स्वप्नांना तुझ्या  नवीन क्षितिज लाभू दे ,

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा अजनाळे गावच्या सरपंच पदी सौ अनिता पवार या कार्यक्षम महिला आहेत.त्यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1983 रोजी झाला.माहेरची परिस्थिती जेमतेम होती.18 जून 1999 रोजी त्यांचा विवाह चंद्रकांत पवार यांच्याशी झाला. घर सांभाळत त्यांनी शिक्षण पूर्ण केले.त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांचे सासू ,सासरे व पती यांचे मोलाचे सहकार्य लाभले. SNDT महिला विद्यापीठ मुंबई या विद्यापीठातून त्यांनी बीएड प्रथम श्रेणीतून पूर्ण केले.त्यानंतर पुढे एम ए  चे शिक्षण पूर्ण केले. नंतर काही काळ स्पर्धा परीक्षांची तयारी केली.दरम्यान त्यांनी पायोनियर इंग्लिश मिडियम स्कूल( य) मंगेवाडी या शाळेमध्ये सहशिक्षिका म्हणून काम केले. त्यांचे काम चांगले होते त्यांच्या कामामुळे त्यांना महाराष्ट्र फाउंडेशन माळीनगर तर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. कोविडच्या  काळातही त्यांनी शिक्षकाचे काम चांगले केले.लोहार समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला. त्या काळात त्या अजनाळे गावच्या ग्रामपंचायत मध्ये बिनविरोध  निवडून आल्या. ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी चांगले काम केले .15 जानेवारी 2025 रोजी त्यांची सरपंच पदी निवड झाली. अजनाळे गावाबद्दल त्यांना आपुलकी आहे. गावचा विकास करण्यासाठी त्या गावांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवतात. त्यांना जी सरपंच होण्याची संधी दिली त्याचं त्या सोनं करण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यांचे कुटुंब उच्चशिक्षित आहे . त्यांची मुलगी बी फार्मसी होऊन पुणे येथे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नोकरी करते. मुलगा पुण्यातील नामांकित इंजिनिअर कॉलेजमध्ये बी टेक चे शिक्षण घेत आहे.अनिता पवार यांच्या या कार्यामध्ये त्यांचे पती श्री चंद्रकांत पवार यांचा  मोलाचा वाटा आहे.त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे, अशा महिला सरपंच अनिता पवार  अजनाळे गावाला लाभल्यामुळे गावचा विकास नक्कीच होणार आहे.


संकलन पत्रकार सचिन धांडोरे सांगोला

9834473615

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा