Breaking News

०८ मार्च २०२५

चोपडी येथील श्री.सिद्धनाथ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे कार्य आदर्शवत : पुनम सावंत....! संस्थेचा 5 वा वर्धापन दिन , जागतिक महिला दिन , मान्यवरांचा सन्मान, वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न.


(सांगोला प्रतिनिधी)

  चोपडी येथील श्री. सिद्धनाथ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे विविध उपक्रम हे आदर्शवत व प्रेरणादायी आहेत. जागतिक महिला दिन म्हणजे स्त्रीयांच्या सन्मानाचा दिवस आहे. मुलींनी व स्त्रियांनी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा निर्माण करावा. जीवनात आई-वडील हेच आपले मित्र आहेत समाजातील वाईट गोष्टीचा वेळीच प्रतिकार करण्यासाठी महिलांची एकजुट आवश्यक आहे. श्री. सिद्धनाथ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने या संस्थेचे अध्यक्ष पत्रकार दशरथ बाबर यांनी संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेला विवध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा म्हणजे त्यांच्या जीवनातील आनंददायी क्षण व विकासाला प्रेरणा देणारा उपक्रम आहे असे विचार कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या पुनम सावंत यांनी व्यक्त केले .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विकास एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ आनंदराव गोपाळ बाबर हे होते.

सांगोला तालुक्यातील  श्री. सिद्धनाथ बहुउद्देशीय सामाजिक संस्था चोपडी या संस्थेच्या वतीने संस्थेचा 5 वा वर्धापन दिन, जागतिक महिला दिन,  मान्यवरांचा सन्मान सोहळा, व वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम शनिवार दि. 8 मार्च 2025 रोजी सकाळी 9 वाजता बाळासाहेब देसाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चोपडी येथे संपन्न झाला. विद्यालयाच्या वतीनेही‌  जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले . या कार्यक्रमासाठी सांगोला तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  सर्वप्रथम राष्ट्रमाता  जिजाऊ, सावित्रीबाई फुले, माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

संस्थेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने संस्थेचे मार्गदर्शक म्हणून बाळासाहेब देसाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य के.डी. बाबर यांनी श्री .सिद्धनाथ बहुउद्देशीय सामाजिक संस्था  राबवित असलेल्या उपक्रमाबद्दल प्रशंसा करीत जागतिक महिला दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले .

यावेळी जीवनाच्या विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळा लौकिक मिळविलेल्या पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये विकास एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आनंदराव गोपाळ बाबर, आदर्श माता श्रीमती सिंधुताई कृष्णा बाबर, आदर्श डॉ. वामन गिरीधर चांडवले, यशस्वी उद्योजक शहाजी(आबा) नामदेव बाबर, संस्थेचे मार्गदर्शक प्राचार्य के.डी बाबर, कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या पुनम सावंत ,पत्रकार क्षेत्रातील विविध पुरस्कार प्राप्त करणारे‌ चांदभैय्या शेख , सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी एल. बी. केंगार, राज्य उपाध्यक्ष डिजिटल मीडिया संपादक- पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे सतीशभाऊ रावसाहेब सावंत, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे सर, पोलीस पाटील श्रीमती. सीतादेवी रामचंद्र पाटील, महाराष्ट्र पोलीस सुदर्शना राहुल बाबर,आदर्श शिक्षिका वंदना ज्ञानेश डोंगरे ,डॉ. प्रतिभा केशव बाबर, डॉ. सुवर्णा आनंदराव पाटील-बाबर, डॉ. क्षितिजा मकरंद डोंगरे, उपक्रमशील अंगणवाडी सेविका पूनम सुनील जवंजाळ,आदर्श महिला शेतकरी सुनिता नवनाथ बाबर, नूतन उद्योजक वनिता बाळासाहेब बाबर,स्वच्छतादूत आप्पासाहेब बाबा केंगार ,आपलं मेडिकल चोपडी व आपलं मेडिकल नाझरा या मेडिकलचे मालक रघुनाथ हरिबा बाबर, पत्रकार शशिकांत कोळी, पत्रकार सुनील पवार यांचा शाल श्रीफळ व झाड देऊन सन्मान करण्यात आला.

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेतील विजेते लहान गट- श्रावणी संभाजी पाटील इयत्ता सातवी- प्रथम क्रमांक, तेजस्विनी समाधान बाबर इयत्ता सहावी -द्वितीय क्रमांक, सृष्टी रामचंद्र वराडे इयत्ता सहावी- तृतीय क्रमांक, तेजस्विनी हणमंत बाबर इयत्ता पाचवी -तृतीय क्रमांक, मोठया गटात -अमृता विजय बाबर आठवी ब - प्रथम क्रमांक, तृप्ती दादासो खरात इयत्ता नववी ब- द्वितीय क्रमांक,सिद्धी विजय बाबर इयत्ता नववी‌ ब -तृतीय क्रमांक या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते आपलं मेडिकलचे मालक रघुनाथ बाबर यांच्या तर्फे स्कूल बॅग व शांभवी प्रशांत केंगार हिच्या वाढदिवसानिमित्त एल .बी. केंगार यांच्या तर्फे आंब्याची झाडे भेट देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी बाळासाहेब यादव, सेवानिवृत्त शिक्षक रामचंद्र केंगार, डॉ. नवनाथ बाबर ,अजिततात्या बाबर, बलभीम बाबर , बजरंग बाबर,युवानेते अनिल चौगुले, लक्ष्मण चौगुले, सिद्धनाथ गुरव, अजित बाबर, राजश्री चांडवले स्वाती बाबर, पार्वती केंगार, तसेच बाळासाहेब देसाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका कर्मचारी ,अंगणवाडी सेविका-अलका सूर्यवंशी, सविता चौगुले, मनीषा खळगे, सविता बाबर, ताई जावीर , विजया मेखले, पार्वती केंगार ,उषाताई बंडगर , आरोग्य सेविका-लक्ष्मी माळी, आशा वर्कर -अर्चना दीक्षित, शोभा बाबर ,सुवर्णा पवार ,सुमन तोरणे, वैशाली जरग, सीता लाडे, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी- सदस्य, युवा वर्ग, ग्रामस्थ, विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्दन बाबर सर यांनी केले. उपस्थितांचे स्वागत, प्रास्ताविक व आभार दशरथ बाबर यांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा