करकंब पोलिसांची दबंग कारवाई: जळोली गावातील गांजाचा साठा जप्त.
सांगोला गौरव न्यूज नेटवर्क
दि ०८/०३/२०२५ रोजी करकंब पोलीस ठाणे कडील स.पो.नि .सागर कुंजीर यांचे मार्गदर्शना खाली गोपनीय बातमीदार यांचे मार्फतीने पोलीस हवालदार आर. आर. जाधव व पोलीस हवालदार संदेश शिकतोडे यांनी गुप्त माहिती मिळवली होती की मौजे जळोली ता पंढरपूर या गावचे शिवारातील राजेंद्र रामराव नरसाळे ता पंढरपूर हे गांजाचा अवैध बेकायदेशीर साठा केलेला आहे त्याप्रमाणे करकंब पोलीस ठाणे कडील स. पो .नि. सागर कुंजीर सो यांनी डॉ अर्जुन भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर उमाकांत पटवारी नेमणूक श्री विठ्ठल मंदिर सुरक्षा शाखा पंढरपूर यांचे सोबत पोलीस पथकाने सकाळी छापा टाकून कारवाई केली असता खालील नमूद मुद्देमाल आरोपीकडे मिळून आला आहे एकूण ५ ,६५,६४०/- रुपये किमतीचा एकूण २८.२८२ किलो ग्राम वजनाचा .गांजा वनस्पतीचे पाने, फुले, बोंडे असा मुद्देमालासह त्याचे आरोपी राजेंद्र रामराव नरसाळे यांचे राहते घरी मिळून आलेला आहे सदरच्या प्रकरणी आरोपी राजेंद्र रामराव नरसाळे रा जळवली यांचे वर गुंगीकारक औषधे द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क),२० (ब)|| (क) प्रमाणे सरकारतर्फे पोलीस हवालदार आर आर जाधव यांनी तक्रार देऊन गुन्हा दाखल केलेला आहे आरोपी अटक करण्यात आलेली असून सदरचा गुन्ह्याचा तपास सुरू आहे मा पोलीस अधीक्षक सो श्री अतुल कुलकर्णी साहेब व अप्पर पोलीस अधीक्षक सो श्री प्रीतम यावलकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सो पंढरपूर विभाग डाँ अर्जुन भोसले यांचे मार्गदर्शना खाली सदरची कारवाई करण्यात आलेली आहे
सदरच्या कामगिरी स.पो.नि. सागर कुंजीर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार १८९८ आर आर जाधव यांनी फिर्याद दिलेली असून सदरच्या कारवाईमध्ये डॉ अर्जुन भोसले उप विभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर उमाकांत पटवारी नेमणूक श्री विठ्ठल मंदिर सुरक्षा शाखा पंढरपूर सपोनि सागर कुंजीर पो.हे.काँ.१८९७ जाधव,पो.ह.वा.१०७० राजकर, पो. ह. वा. ४२४ घोळवे,पो.ह.वा.९९० भोसले ,पो. ह. वा. १५६७ शिकतोडे ,पो. ह. वा. २३८ सावंत,पो.काँ.१४३ ननवरे, चा.पो.काँ.डी.२६ गात,चा.पो.ह.वा.ब.नं३१६ ननवरे, सह होम शिंदे यांनी केलेली आहे पुढील तपास व पो. उप नि. निलेश गायकवाड हे करीत आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत