Breaking News

पायोनियर स्कूल य.मंगेवाडी मध्ये महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा


 सांगोला गौरव न्यूज नेटवर्क

     ८ मार्च  रोजी  खंडोबा बहुउद्देशीय संस्थेच्या पायोनियर इंग्लिश , सेमी इंग्लिश मिडीयम स्कूल, पायोनियर पब्लिक (CBSE) स्कूल आणि पायोनियर निवासी गुरुकुल य.मंगेवाडी मध्ये महिला दिनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध दिग्दर्शिका , अभिनेत्री प्रा.सुनंदा सोनवले मॅडम, सांगोला तालुका समाजसेविका - मोरे मॅडम, राजुरीच्या डॉक्टर दबडे मॅडम तसेच संस्थेच्या संचालिका सौ. मनिषा येलपले मॅडम, यलमार मंगेवाडी गावच्या  सरपंच प्रतिनिधी सौ.प्रतिमा  अनिल पाटील मॅडम,माजी सरपंच सौ.सखुबाई मासाळ,यलमार ग्रामसेविका शिंदे मॅडम, ग्रामपंचायत सदस्या अश्विनी येलपले मॅडम तसेच आदर्श माता म्हणून सौ.सीमा पवार ताई, बचत गट प्रमुखा अध्यक्ष सौ.पूजा केंगार मॅडम, बंडगर मॅडम, सर्व गावच्या बचत गट सी.आर.पी,अध्यक्षा,उपाध्यक्षा, सचिवा तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल येलपले सर व पायोनियर पब्लिक स्कूल चे प्रिन्सिपल श्री.सतिश देवमारे सर हे उपस्थित होते.
   त्यांच्या मार्गदर्शनाने व वक्तृत्वाने महिलांच्या मनामध्ये एक नवीन उमेद निर्माण झाली. त्यांनी प्रत्येक महिलेला आयुष्यात आपण कुठेच कमी पडू शकत नाही तसेच आपण आपल्या संकटावर कशी मात केली पाहिजे याचे मोलाचे मार्गदर्शन पाहुण्याच्या मनोगताने झाले .यानंतर पायोनियर स्कूल ची रणरागिनी प्रणिती पवार हिने महिला दिनानिमित्त अंगावर शहारे आणणारे भाषण केले सर्व शिक्षकांनी महिला दिनाच्या शुभेच्छा सर्व महिलांना दिल्या मोठ्या संख्येने पालक येते उपस्थित होता हळदीकुंकू समारंभ व छोटीशी भेटवस्तू सर्व महिलांना देण्यात आली .यानंतर प्रमुख पाहुण्याचा सत्कार झाला. महिला दिनानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पाककला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, बलून गेम्स स्पर्धा, हार्डल स्पर्धा, गायन स्पर्धा व फॅशन शो अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विशेष बक्षीसे  काही महिलांनी मिळवली पाककला स्पर्धेमध्ये सौ.निर्मला विठ्ठल येड्रावकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला,द्वितीय क्रमांक सौ.रूपाली अनिल भंडारे तर तृतीय क्रमांक सौ.सुवर्णा लक्ष्मण विभुते  यांनी पटकावला.रांगोळी मध्ये प्रथम क्रमांक सौ.रुणाली राजकुमार कोळवले यांनी पटकावला तर द्वितीय क्रमांक सौ.सीमा राजेंद्र पवार तर तृतीय क्रमांक सौ.प्रियंका अविनाश चौगुले यांनी पटकावला. तिसरी स्पर्धा फॅशन शो मध्ये प्रथम क्रमांक सौ.सीमा राजेंद्र पवार द्वितीय क्रमांक सुवर्णा लक्ष्मण विभुते तर तृतीय क्रमांक सौ.रुणाली राजकुमार कोळवले यांनी मिळवला. गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सौ.सीमा राजेंद्र पवार, द्वितीय क्रमांक सौ.वर्षा दीपक ढोले, तृतीय क्रमांक सौ.रुणाली राजकुमार कोळवले यांनी मिळवला तसेच बलून गेम  स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सौ.स्वाती उत्तम विभूते, द्वितीय क्रमांक सौ.सोनाली आकाश सोळसे, तृतीय क्रमांक सौ.रूपाली अरुण भंडारे तसेच हार्डल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सौ.प्रियंका अविनाश चौगुले द्वितीय क्रमांक सौ.सीमा योगेश  सोळसे तृतीय क्रमांक सौ.ज्योती निलेश येलपले यांनी मिळवला   
        विजेत्या सर्व महिलांना प्रशस्तीपत्रक व ट्रॉफी देण्यात आली महिला दिनानिमित्त पायोनियर संकुल मध्ये आनंदीमय वातावरण तयार झाले होते आणि या आनंदीमय वातावरणासाठी पायोनियर पब्लिक स्कूल चे सर्व शिक्षक तसेच पायोनियर सेमी इंग्लिश स्कूलचे सर्व शिक्षक यांनी अतिशय परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. संध्या मगर मॅडम व  बबीता राऊत मॅडम यांनी केले            
       कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ सुनीता रुपनर मॅडम यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत