Breaking News

मनूश्री संस्थेने महिलांचा सन्मान वाढवीला :पुनम होलमूखे


 सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:

(मनुश्री संस्थेचा कडीमळा जत शाळेत महिला दिन साजरा) 

जत:मनुश्री महिला बहुउद्देशीय विकास मंडळाच्या वतीने जि.प.शाळा कडीमळा जत येथे महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी दरवर्षीप्रमाणे आल्या.गरजू महिलांना संसारोपयोगी साहित्य साडी व काही रक्कम भेट स्वरुपात देण्यात आली.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्यध्यापिका सौ. पुनम होलमूखे यांनी मनुश्री संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना संस्थेने गेली 9 वर्षे महिलांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत करून महिलांचा समाजात सन्मान वाढविण्याचे कार्य केले याचा आदर्श सर्वांनी घ्यावा.यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.नम्रता सुर्यवंशी मॕडम यांनी महिलांनी दैनंदिन जीवनात आपले कर्तव्य बजावत असताना स्वतःकडे लक्ष देऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व कुटुंब निरोगी व संस्कारीत करावे याचे मार्गदर्शन केले.

         यावेळी समर्थ संस्थेचे अध्यक्ष दिगंबर सांळुखे सर यांनी ही महिलांना मार्गदर्शन केले.


संस्थेच्या संस्थापक सचीव सौ.नयना सोनवणे यांनी  प्रास्तविक करुन संस्थेने राबविलेले उपक्रम,संस्थेचा उद्देश याची माहिती दिली.सर्वांचे आभार सहशिक्षिका वाघमोडे मॕडम यांनी आभार मानले.शाळेतील मुलांना व उपस्थित महिलांना अल्पोपहार आणि खाऊ वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास संस्था सदस्या श्रीमती राजश्री शिंदे, सौ विमल जाधव, सौ भावना कोळी यांचेसह शाळेचे विद्यार्थी,शिक्षक,पालक,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत