Breaking News

आनंदी जीवन जगण्यासाठी ध्यानधारणा आवश्यक.. अध्यक्ष शिवानंद भरले.! सांगोला तालुका पेन्शनर संघटनेच्या वतीने पेन्शनर डे साजरा..


 सांगोला प्रतिनिधी 

       जीवनामध्ये सुखी, आनंदी व निरामय जीवन जगण्यासाठी दिवसाची सुरुवात ओम काराने करावी व याचे प्रात्यक्षिक सर्वाकडून करून घेऊनच, आनंदी जीवन जगा व यासाठी ध्यानधारणा गरजेचे आहे व मार्गदर्शक अ. कृ. मोहिते गुरुजी त्यांच्यापासून आपल्या कामकाजाची सुरुवात झाली असे महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष शिवानंद भरले यांनी सांगोला तालुका पेन्शनर संघटनेच्या वतीने पेन्शनर डे या कार्यक्रमात सांगोला कार्यालयात अध्यक्षपदावरून बोलताना मत व्यक्त केले.


सुरुवातीस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच सेवानिवृत्त मयत शिक्षक यांच्या बद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली. 


    सदर प्रसंगी त्यांनी स्वतः आजारी असताना पत्नी सौ. सारिका भरले व मुलांनी ओम कराने सतत ध्यान केल्याने मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने वाचलो असा जीवन पट सांगितला तसेच सेवानिवृत्तांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पेन्शनर संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन ही शिवानंद भरले यांच्या शुभहस्ते व जिल्हाध्यक्ष सुभाष फुलारी, उपाध्यक्ष शंकर जाधव, कार्याध्यक्ष काळापा सुतार, संघटक शांत आप्पा कांबळे, संघटनेचे अध्यक्ष वसंतराव दिघे, सल्लागार शंकर सावंत, सिद्धेश्वर झाडबुके, दिनकर घोडके, विलास नलावडे, इ. उपस्थितीत करण्यात आले. प्रास्ताविक वसंतराव दिघे यांनी तर दलित मित्र सदाशिव साबळे, विठ्ठल शिवशरण, दिनकर घोडके, सुभाष फुलारी, जयवंतराव नागणे, भारत हाके इ.नी मनोगत व्यक्त केले.
 यावेळी संघटनेतर्फे शंकर सावंत, गंगाराम इमडे, अरुण वाघमोडे, तसेच शिक्षक नेते भारत हाके यांनी शिवानंद भरले व सुभाष फुलारी, तसेच जागेचे मालक रविंद्र माने, कवी शिवाजीराव बंडगर, रविराज शेटे व 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सेवानिवृत्त शिक्षक सदाशिव साबळे, जयवंतराव नागणे, महादेव चौगुले, शाहू गडहिरे, महादेव कांबळे, यशवंत मोहिते, पांडुरंग शिंदे, मनोहर शिंदे, गुंडाराम शिंदे, लक्ष्मण सावंत, श्रीमती सुमन सरगर, वसंत लिगाडे, आनंदा वाघमारे, सदाशिव कांबळे, मोहम्मद मुलानी, विठ्ठल मोहिते, अरविंद डोंबे, प्रभाकर कसबे, सुखदेव कदम, शंकर सावंत, सिद्धेश्वर झाडबुके इ.चा सत्कार करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक बहुसंख्येने हजर होते.सूत्रसंचालन संचालिका प्रतिभा शेंडे व सिद्धेश्वर झाडबुके यांनी तर आभार दत्तात्रय खामकर यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत