श्री क्षेत्र दत्त देवस्थान मोराळे पेड येथे गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज यांच्या जयंतीचे आयोजन..
सांगोला प्रतिनिधी
श्री गुरु नरसिंह सरस्वती| अवतार असे त्रिमूर्ती ||
मोराळे ग्रामी असे ख्याती |
जे जाती तया स्थाना तात्काळ होती मनोकामना |
काही न करो हो अनुमाना
प्रत्यक्ष देव तेथे असे ||
श्री क्षेत्र दत्त देवस्थान मोराळे पेड ता. तासगाव श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराज म्हणजेच प्रत्यक्ष श्री दत्तगुरु देव तेथे आहेत व अनेक भक्ताचे व्याधी, बाधा निरसन होते व अशा या नरसिंह सरस्वती दत्त महाराजांची जयंती सोमवार दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी होत असल्याचे गुरुवर्य भालचंद्र पाटील काका व गुरुवर्य संतोष दादा पाटील यांनी सांगितले.
जयंतीनिमित्त भजन व गुरुवर्य भालचंद्र पाटील काका व गुरुवर्य संतोष दादा पाटील यांचे प्रबोधन ही होणार आहे तरी गुरु नरसिंह सरस्वती भक्तगणांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्वामीभक्त सूर्यकांत दादा पाटील यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत