Breaking News

नाझरे गणातील विकासासोबत लाल बावट्याची विचारधारा टिकवण्यासाठी कटिबद्ध - कॉम्रेड अतुल फसाले



 प्रतिनिधी- सांगोला 

नाझरे गणातील सर्वांगीण विकास साधताना श्रमिक, शेतकरी, कष्टकरी व वंचित घटकांच्या हक्कांची लढाई लढणारी लाल बावट्याची विचारधारा जपण्याचा ठाम संकल्प मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षचा(CPI-M) उमेदवार म्हणून करत आहे. विकासाच्या नावाखाली सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका आहे .

रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य व रोजगार या मूलभूत सुविधांचा दर्जेदार विकास करतानाच सामाजिक न्याय, समानता व लोकशाही मूल्ये अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे . विकास हा केवळ आकड्यांपुरता मर्यादित न राहता सामान्य माणसाच्या जीवनमानात प्रत्यक्ष बदल घडवणारा असावा, ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची ठाम भूमिका आहे.

नाझरे गणातील तरुण, महिला, शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांना विश्वासात घेऊन लोकसहभागातून विकास प्रक्रिया राबवली जाईल. अन्याय, शोषण व भ्रष्टाचाराविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लाल बावट्याखाली संघर्ष अधिक तीव्र केला जाईल.

नाझरे गणाच्या प्रगतीसाठी विकास आणि विचारधारा यांचा समन्वय साधत आम्ही कटिबद्ध आहोत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत