राजे शिवाजी सैनिकी पॅटर्न स्कूल अनकढाळ मध्ये बालसाहित्य संमेलन संपन्न
सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:
राजे शिवाजी सैनिकी पॅटर्न स्कूल, ज्युनियर कॉलेज अनकढाळ मध्ये बाल साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री पांडुरंग कोकरे सर होते.यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक कविता सुंदर तालासुरात सादर केल्या. अर्थपूर्ण लेख सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. प्रकट वाचन तसेच अभंग , गवळणी तसेच मराठी प्रकट वाचन करून उपस्थितांची मने जिंकली.
या नाविन्य उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना कला गुण सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळाले.
मराठी भाषा शिक्षक श्री.मारुती काटे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळण्यासाठी दरवर्षी या बालसाहित्य संमेलनाचे आयोजक करण्यात येणार आहे.
सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाने बाल साहित्य संमेलन उत्साहात पार पडले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत