Breaking News

करकंब पोलीसांची एम. पी. डी. ए. कायदयाअंतर्गत सराईत गुन्हेगार बालाजी पवार यांचेवर कारवाई.


 पंढरपूर (प्रतिनिधी)

मा. पोलीस अधिक्षक  अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक  प्रितम यावलकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी  पंढरपुर विभाग, डॉ. अर्जुन भोसले, तसेच पोलीस निरीक्षक निंबाळकर, स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनखाली सराईत गुन्हेगार यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करणेबाबत आदेश दिलेले होते.

करकंब पोलीस ठाणे हददीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार यांचेवर दोन पेक्षा जास्त दखलपात्र गुन्हे असुन त्यामध्ये जामीनावर असतानाही ते पुन्हा पुन्हा मारामारी, खुनाचा प्रयत्न, चोरी व जबरी चोरी या सारखे गुन्हे करीत आहेत. तसेच त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करुनही त्यांचेमध्ये फरक पडत नसल्याने सराईत गुंड यांचेवर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, थोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती (व्हिडीओपायरेटस), वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणारे व्यक्तियांच्या विघातक कृत्यांना प्रतिबंधक सुधारीत अधिनियम २०१५ चे कलम ३(१) प्रमाणे ०१ वर्षाकरीता स्थानबध्द करणेकरीता मा. जिल्हाधिकारी, सोलापुर यांचेकडे मा. पोलीस अधिक्षक व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपुर यांचे मार्फतीने प्रस्ताव पाठविण्यात आलेले होते.

सदरच्या करकंब पोलीसांनी पाठविलेल्या प्रस्तावामधील खेडभोसे गावातील रेकॉर्डवरील गुन्हेगार इसम नामे बालाजी हणुमंत पवार रा. खेडभोसे ता. पंढरपुर यांचेवर करकंब पोलीस ठाणे व इतर पोलीस ठाणे अंतर्गत खुनाचा प्रयत्न, वाळु चोरी, विनयभंग, जबरी चोरी, मारामारी अश्या विविध गुन्हेमध्ये सक्रिय असुन त्यास दोनवेळा तडीपार करुनही तो वारंवार गुन्हे करीत होता. अलिकडच्या काळात त्याने नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये जबरी चोरी करीत मोटार सायकल वोरुन नेली होती. त्यानंतर करकंब पोलीसांनी त्याचेवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करुन एम पी डी ए कायदयातील तरतुदी नुसार त्याचेविरुध्द कारवाई केलेली होती. सदरच्या प्रस्तावर मा. जिल्हाधिकारी सोो सोलापुर यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती (व्हिडीओपायरेटस), वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणारे व्यक्तियांच्या विघातक कृत्यांना प्रतिबंधक सुधारीत अधिनियम -२०१५ चे कलम ३(१) प्रमाणे ०१ वर्षाकरीता दि.१०/०३/२०२५ रोजी आदेशीत करुन त्यास स्थानबध्द केले असता. दोन दिवस पोलीसांना हुलकावणी देणारा सराईत गुन्हेगार बालाजी पवार यास करकंब पोलीस पथकाने दि. ११/०३/२०२५ रोजी बसस्थानक मोहोळ येथुन ताब्यात घेवुन येरवडा जेल, पुणे येथे खानगी केलेली आहे. तसेच यापुढे रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगार, दोन पेक्षाजास्त गुन्हे असलेले आरोपी, हातभटटीवाले, वाळु तस्कर, गुंड व दादा व गुन्हेगारी टोळीवर करकंब पोलीस तडीपार, हद‌द्वार व स्थानबध्द अश्या इसमांवर कडक कारवाई करणार आहेत असे सांगीतले.

सदरची कामगीरी मा. जिल्हाधिकारी सो सोलापुर, नायब तहसिलदार गृह विभाग, सोलापुर जिल्हाधिकारी कार्यालय यांचे मार्गदर्शन खाली सोलापुर ग्रामीण पोलीस अधिक्षक श्री अतुल कुलकर्णी सो। व अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सो। पंढरपुर विभाग  डॉ. अर्जुन भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निंबाळकर सोो यांचे मार्गदर्शनखाली करकंब पोलीस ठाणेचे प्रभारी सपोनि/सागर कुंजीर, पोउपनि / निलेश गायकवाड, ग्रेड पोउपनि/संजय मुळे यांचेसह सफो/शेंडगे, पोहवा /१८९७आर आर जाधव, पोहवा /१५८३ मोरे, पोहवा /९०३ कांबळे, पोहवा /१६२९ सागर भोसले, पोहवा /१५६७शिकतोडे, पोना/५२४ हजारे, पोना/८३५ लेंगरे, पोकॉ/७१५ गायकवाड तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील पोहवा/अनिस शेख यांनी कामगीरी बजावली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत