सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:
अजनाळे ग्रामपंचायतीच्या वतीने दि २१ फेब्रुवारी २०२५ रोजी तहसील कार्यालय सांगोला, जलसंधारण उपविभागीय, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ, सांगोला पोलीस स्टेशन, यांना लेखी अर्ज देऊन अजनाळे गावातील शेजाळ पाझर तलावामध्ये बेकायदेशीररित्या होत असलेला पाणी उपसा तात्काळ बंद करावा अशी मागणी अजनाळे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच अनिता पवार व ग्रामपंचायत अधिकारी संदिप सरगर यांनी केली होती.
अजनाळे ता सांगोला शेजाळ पाझर तलावामध्ये महिना -दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने गावच्या पिण्याची पाण्याची मदार शेजाळ पाझर तलावाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे प्रशासनाला बेकायदेशीर होत असलेला पाणी उपसा बंद करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी जर पाणी उपसा या दोन-चार दिवसांमध्ये बंद नाही केला तर मार्च महिना अखेरपर्यंत पाण्याची भीषण टंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी तात्काळ पाणी उपसा बंद करून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे अशी अपेक्षा केली जात आहे. पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांनी जर प्रशासनाला न जुमता पाणी उपसा सुरू ठेवला तर त्यामुळे अजनाळे गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही तरी संबंधित प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन शेजाळ पाझर तलाव मधील बेकायदेशीर पाणी उपसा बंद करावा अशी मागणी गावातील ग्रामस्थ मधून जोर धरू लागली आहे. फोटो
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
ग्रामपंचायतीने केलेल्या अहवानाला काही शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत स्वतःहून बेकादेशीर विद्युत मोटारी काढून टाकल्या आहेत तरी राहिलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या मोटारी काढून ग्रामपंचायतीस सहकार्य करावे अन्यथा होणाऱ्या कारवाईस जबाबदार राहावे लागेल..
सरपंच अनिता चंद्रकांत पवार ग्रामपंचायत अजनाळे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा