Breaking News

२८ जानेवारी २०२५

अभिनव पब्लिक स्कूल, अजनाळे येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा......


 

सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:

अभिनव पब्लिक स्कूल, अजनाळे येथे भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षीचे ध्वजारोहण मेजर तानाजी लिंगडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष शिवाजी लाडे सर, मुख्याध्यापिका कावेरी गिड्डे , सतीश येलपले पोलीस, आकाश पाटील, पांडुरंग लाडे, मधुकर शेंबडे, परमेश्वर लाळगे, लक्ष्मण पाटील आदी मान्यवर त्याचबरोबर मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

मान्यवरांचे  सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या कवायती सादर केल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून भारतीय संविधानाचे महत्त्व स्पष्ट केले तसेच अनेक क्रांतिकारकांच्या जीवनातील प्रेरणादायक घटनांचा आढावा घेत, शेतकऱ्यांच्या व्यथा व देशभक्तीपर गीत सादर केले. तर  भारती सर यांनी आपल्या मनोगतातून भारतीय संस्कृतीचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. मेजर तानाजी लिंगडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळा प्रशासन व विद्यार्थी विकास याबाबत समाधान व्यक्त करत सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमाची सांगता खाऊ वाटपाने करण्यात आली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा कदम यांनी केले  तर आभार प्रदर्शन वंदना शिंदे यांनी केले.कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी  परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा