Breaking News

पायोनियर स्कूल य. मंगेवाडी मध्ये जवानांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा.....


 

सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:

खंडोबा बहुउद्देशीय संस्थेच्या पायोनियर पब्लिक (CBSE) स्कूल, पायोनियर इंग्लिश & सेमी इंग्लिश मिडीयम स्कूल आणि पायोनियर निवासी गुरुकुल य. मंगेवाडी मध्ये सीमेवर भारतमातेचे रात्रंदिवस रक्षण करणाऱ्या शुर जवानांच्या हस्ते ध्वजारोहण करून एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.

      २६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता आसाम आकुर्डी येथे चीन सीमेवर कर्तव्य बजावत असलेला जवान  निलेश पाटील आणि दिल्ली येथे कर्तव्य बजावत असलेला जवान अनिकेत बेहेरे या दोन शुर जवानांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.यावेळी य. मंगेवाडी गावचे उपसरपंच अनिल पाटील, मा.सरपंच दत्तात्रय मासाळ , त्रिमूर्ती अर्बन बँकेचे चेअरमन चंद्रकांत चौगुले, मा.सरपंच प्रकाश सोळसे , मा.सरपंच तुकाराम येलपले , पिंपरी येथील श्री जाधव सर , मोरे मॅडम , दिलीप येलपले सर बोंबेवाडी येथील देवदास पाटील , राजकुमार कोळवले , अतुल येलपले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

     पायोनियर शाळेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी देशभक्तीपर गाणी सादर करून  भारतमातेच्या  स्वातंत्र्यासाठी रक्त संडणाऱ्या शुर वीरांना त्रिवार वंदन करून  उपस्थीतांचा देशाभिमान जागृत केला. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांमधून प्रखर राष्ट्रवाद , देशभक्ती , देशाच्या प्रगतीची गाथा सांगून एक नागरिक म्हणून प्रत्येकाने देशांच्या विकासात हातभार लावून शहिदांचे बलिदान व्यर्थ न जाऊ देण्याचे आवाहन केले.

      यावेळी पायोनियर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनेक साहसी कवायती सादर केल्या.   


 
       पायोनियर स्कूल चे संस्थापक अध्यक्ष अनिल येलपले सर आणि त्यांचे सहकारी शिक्षक शाळेतील विद्यार्थ्यांना पहाटे ५ पासून व्यायाम , योग , प्राणायाम आदी प्रकार घेऊन त्यांना शारीरिक व मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असतात.शाळेचे अनेक विद्यार्थी सध्या देशसेवेत आहेत.तर  विद्यार्थ्यांना  सैन्यात भरती होण्यासाठी नेहमी ट्रेनिंग कॅम्प चे आयोजन केले जाते.विविध क्रिडा प्रकारांचे प्रशिक्षक दिले जाते.शाळेचे अनेक खेळाडू नॅशनल लेव्हल ला गेले आहेत. यावेळी क्रिडा तसेच रंगोत्सव स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थांना पारितोषिके देण्यात आली.

           प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष अनिल येलपले सर  व CBSE प्रिंसीपल सतीश देवमारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिडाशिक्षक मोहन वाघमारे सर यांनी ग्राउंड ची आखणी आकर्षक केली होती. सांस्कृतीक विभाग प्रमुख परवीन मिस सर्व विभाग प्रमुख, सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाने कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशुतोष रुपनर सर यांनी केले तर आभार पूजा होटे मॅडम यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत