Breaking News

२९ जानेवारी २०२५

देशमुखवस्ती अंगणवाडी शाळेला अजनाळे ग्रामपंचायतीकडुन सहकार्य करू; सरपंच अनिताताई पवार......


 

अजनाळे: सचिन धांडोरे

 विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आरोग्यासाठी अंगणवाडी शाळेसाठी कोणत्याही प्रकारची मदत लागली तर ती निश्चितपणे अजनाळे ग्रामपंचायत यांच्यावतीने सहकार्य केले जाईल असा विश्वास अजनाळे ग्रामपंचायतीच्या नुतन सरपंच अनिता ताई पवार यांनी व्यक्त केला. 

काल मंगळवार दि २८ जानेवारी रोजी देशमुख वस्ती अंगणवाडी येथे हळदी कुंकु कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी उपसरपंच बापु कोळवले, पर्यवेक्षिका महालक्ष्मी देशमुख, मुख्याध्यापक उषा पाटील, सहशिक्षिका सुनिता पाटील, माता पालक समिती अध्यक्ष वेदिका कुरे, आदलिंगे गुरूजी, चंद्रकांत पवार, संदिपान शेंबडे, सेविका सुनिता यलमार, मदतनीस रंजना भोसले यांच्यासह माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे बोलताना सरपंच अनिता पवार म्हणाल्या की,महिलांनी आजच्या धावपळीच्या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहीजे महिलांनी गर्भातच मुलींना मारु नका शासन स्तरावर बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान राबवुन जनजागृती मोठ्या प्रमाणात चालू आहे. आपल्या गावामध्ये अशा प्रकारच्या घटना घडू नयेत याची काळजी घ्यावी असे आवाहन या वेळी केले.देशमुख वस्ती अंगणवाडी शाळेचे कामकाज चांगले असुन कामकाज विषयी समाधान व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुनिता पाटील यांनी केले 

या कार्यक्रमाला माता पालक मोठ्या संख्येने हजर होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा