विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.
पुणे :- पुणे येथील जागतिक पातळीवर घेण्यात आलेल्या भिडेवाडा काव्य महोत्सवात राज्यभरातून दोनशे वीस कवी कवयत्रीने हजेरी लावली या महोत्सवाचे मुख्य आयोजक भिडेवाडाकार गझलकार कवी आदर्श शिक्षक दत्तक पिता विजय वङवेराव यांनी आयोजन केले होते.
या काव्य महोत्सवात अध्यक्ष प्रमुख पाहुणे विना विचार पीठ सजले होते सगळेच साहित्यिक हेच प्रमुख आकर्षण ठरले . समान संधी देवून साहित्याचा दर्जा जपला साहित्यिक क्षेत्रातातील जगातले अनोखे दर्शन पाहण्यास मिळाले.
सर्व मान्यवर साहित्यिकांना भिडे वाडा बोलला या शीर्षकाने लिहिलेल्या तिरंगी शेला ,बॅच ,सन्मानपत्र , गुलाब पुष्प देवून गौरविण्यात आले.
सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत काव्य महोत्सव बहारदार दमदार विचार पीठ कवितेने गजबजलेले दिसत होते .टाळ्यांच्या कडकडाटात कवी कवयत्रीचे स्वागत होत होते.
समानता, जिद्द, चिकाटी जपत बा.ह. मगदूम, सुवर्णा पवार, प्रतिमा काळे, अनिल नाटेकर ,राहुल जाधव, संविधानिक काम करणारे कार्यकर्ते उपस्थित होते .
काव्य महोत्सवात प्रामुख्याने सावित्रीबाई फुले ज्योतिबा भिडेवाडा शिक्षणाची महती सा़ंगणारे काव्य सादर झाले .गीत, गझल, अभंग , मुक्तछंद, पोवाडा, धनगरी ओव्या चित्रपटाच्या चालीवरती गीत रचना सादर झाल्या असून उत्कृष्ट रचना देवेंद्र गावंडे ,समाधान लोणकर, हेमंत जोशी, डॉ. मधुकर हुजरे ,अशोक मोहिते, कविता काळे, संतोष गाढवे, मधुकर गिलबिले, सुमीत हजारे, शोभा जोशी, ऊर्मिला झगडे, जनाबापू पुणेकर, सुवर्णा पवार, मनिषा पावले, प्रदीप गांधलीकर, सरिता कलढोणे, आनंदा ढाले, अनिल नाटेकर, प्रतिभा काळे, राजेश थळेकर, सविता इंगळे, रानकवी जगदीप वनशिव, सावित्री गायकवाड ,अनिसा शेख, उमाकांत आदमाने, आत्माराम हारे, योगीराज कोचाडे, चंद्रकांत जोगदंड, करूणा कंद, मेहमूदा शेख, डॉ. सुनिता धर्मराव, योगिता कोठेकर, असे अनेक साहित्यिकांनी प्रखर शब्दांत आपले मत कवितेतून मांडले.
सर्व साहित्यिकांना नाष्टा, चहा दुपारचे चविष्ट असे भोजन हे सगळे मोफत देण्यात आले असून अनेक ज्येष्ठ नागरिक पत्रकार कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाची सा़ंगता भिडेवाडाकार विजय वडवेराव यांनी जगभर असे काव्य सोहळे व्हावे अशी इच्छा प्रगट केली असून प्रत्येक राज्यात पुढील काळात ते भिडेवाडा काव्य महोत्सव घेण्याचा संकल्प केला असून अनेक संस्थांनी असा उपक्रम राबविले पाहिजेत. गेली तेरा वर्षापूर्वीची साहित्य सेवा करत आहे एकटाने स्वखर्चातून हा काव्य महोत्सव घेण्यात आला आहे असे ते म्हणाले, एका दानशूर व्यक्तीने बारा हजार देणगी दिला असता विजय वडवेराव यांनी ती जाहीरपणे परत केलीअशाप्रकारे भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सव पिंपरी चिंचवड येथील सावित्रीबाई फुले सभागृहात उपस्थितीत सर्व मान्यवरांचे आभार मानून संपन्न झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा