विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.
बारामती :- राष्ट्रीय आर्म स्पोर्ट्स स्पर्धेत बारामतीचा असित अतुल गायकवाड याचं अव्वल मानांकन. विरार येथील मुलजीभाई मेहता इंटरनॅशनल स्कूल मध्ये झालेल्या ४८5 व्या राष्ट्रीय आर्म स्पोर्ट्स स्पर्धेत महाराष्ट्राने तिसरा क्रमांक मिळविला,तर असित गायकवाड बारामती याने राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्र आर्म स्पोर्ट्स असोसिएशन आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितीज ठाकूर आयोजित या स्पर्धेत १५ राज्यातील ६०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला. त्यातील 90+ विभागात पुण्यातील विश्वकर्मा इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजच्या संगणक विभागात बी-टेक (तृतीय वर्ष) शिक्षण घेत असलेला असित गायकवाड राष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम कामगिरी करत प्रथम विजेता ठरला. सर्व सामने पार करत महाराष्ट्राच्या असितची अंतिम लढत हरयाणाच्या खेळाडू सोबत असताना असितने शक्ती बरोबरच युक्तीचं अफाट प्रदर्शन करत ही लढत अगदी लीलया जिंकली आणि सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला.
कबड्डी पटू, बॅडमिंटन पटू, फुटबॉल पटू स्विमर तसेच उत्कृष्ट गायक ,उत्कृष्ट पियानो, गिटार,बासरी वादक असलेला असित अतिशय हुशार,होतकरू आणि विलक्षण नम्र म्हणून बारामती ,पुणे आणि वालचंदनगर परिसरात ओळखला जातो. वालचंदनगर येथील भारत चिल्ड्रन्स अकॅडमी येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी पुणे येथे वास्तव्यास असलेल्या असितचे इंदापूर ,बारामती तालुक्यामधुन तसेच पुणे जिल्ह्यामधे आणि आता राज्यातून थेट देशात ,घराघरात असित आता युवा पिढीसाठी प्रेरणा ठरलेला आहे .
प्रसिद्ध चित्रकार म्हणून नावाजलेले श्री. अतुल गायकवाड सर आणि आदर्श विद्यार्थी प्रिय शिक्षिका सौ.नलिनी गायकवाड हे असित चे आईवडील आहेत. शिक्षणाबरोबर मैदानी खेळ आणि त्याची आवड असलेल्या असितचं विविध माध्यमातून आणि सर्वच स्तरांमधून त्याचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा