Breaking News

१० जुलै २०२४

बारामती येथे रंगला अभिनव पुस्तक सोहळा आणि कवी संमेलन..


 विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.

बारामती:- पंचक्रोशी प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या मा. अनिता रामलिंग ताबे यांचे स्वलिखित जीवनबाग या काव्यसंग्रहाचे मोठ्या दिमाखात प्रकाशन संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मधुकर वाघमारे ,अध्यक्ष डॉ. अविनाश संगोलेकर,  त्याचबरोबर हनुमंत चांदगुडे ,विजय काकडे, युवराज खलाटे ,वनिता जाधव, वनिता भुतकर ,अलका रसाळ पंचक्रोशी प्रकाशन संस्थेचे संपादक बाळासो करचे आदी मान्यवर उपस्थित होते.

 या कार्यक्रमासाठी एकूण  ५० कवींनी सहभाग घेतला होता.  या कार्यक्रमाचे आयोजन पंचकोशी प्रकाशन च्या वतीने करण्यात आले होते. 

यावेळी कार्यक्रमाबद्दल आपले मत व्यक्त करताना अध्यक्षांनी कविता कशी असावी आणि कविता केव्हा जन्मास येते .कवितेचे स्वरूप कसे असते याबद्दल आपले मत व्यक्त केले त्याचबरोबर नवोदित कवींना मार्गदर्शन केले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शब्दरत्न ह. भ. प. शुभांगी सोमनाथ जाधव व कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुप्रिता डांगे यांनी केले. त्याचबरोबर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रामलिंग ताबे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा