Breaking News

२४ मे २०२४

सारनाथ बुद्ध विहार म्हैसगाव येथे तथागत बुद्ध जयंती उत्साहाने साजरी.

विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.

कुर्डूवाडी :-  दिनांक 23. 5. 2024 गुरुवार रोजी शांततेचा संदेश देणारे महाकारुणीक तथागत गौतम बुद्ध यांची 2568 वी जयंती मोठ्या उत्साहाने सारनाथ बुद्ध विहार म्हैसगाव येथे संपन्न झाली. 

यावेळी प्रथम तथागत गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. तदनंतर सामुदायिक धम्म वंदना बौद्धाचार्य सुनील चांदणे व सोमनाथ चांदणे यांनी  घेतली. बुद्ध जयंतीच्या निमित्ताने तथागत गौतम बुद्ध यांचे जीवन कार्य व पौर्णिमेचे महत्व या विषयी अनमोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सुदाम चांदणे , रोहिदास चांदणे ,विकास कदम, हनुमंत चांदणे , ताई चांदणे, गुणाबाई चांदणे, लताबाई चांदणे , लक्ष्मी चांदणे,छबाबाई चांदणे, शारदाताई रिकिबे कुसुम चांदणे द्रोपती चांदणे, संविधान चांदणे, साक्षी चांदणे तसेच लहान बालके महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी उपस्थिताना खीर दान वाटप करण्यात आली.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा