Breaking News

०३ जून २०२४

पत्रकार संरक्षण समिती सोलापूर जिल्ह्याच्या वतीने मा. विलास जगधने सर यांना आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित...


 विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.

 पंढरपूर :- दि .1/6/24 शनिवार रोजी आनंदी विनायक मल्टीपर्पज पंढरपूर या ठिकाणी माननीय विलास जगधने यांचा सेवानिवृत्ती व वाढदिवसाच्या निमित्त भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील वाळूजकर नगरपालिका पंढरपूर यांनी स्वीकारले व माजी आमदार दत्तात्रय सावंत सर पुणे विभाग यांच्या हस्ते मा.विलास जगधने यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार संरक्षण समिती जिल्हा सोलापूर यांच्यावतीने आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान केला .

यावेळी पत्रकार संरक्षण समिती जिल्हा अध्यक्ष सुनील चांदणे मा .आमदार दत्तात्रय सावंत सर व गटशिक्षण अधिकारी मारुती लिगाडे, मा. राजू सर्वगौड नगरसेवक डी राज सर्वगौड, भंते बोधीरत्न या मान्यवर उपस्थित शाल, हार, सन्मान चिन्ह देऊन सन्मान गौरव करण्यात आला. हा सन्मान सामाजिक, धार्मिक ,शैक्षणिक कार्य करताना योगदान दिल्याने उद्याच्या सुसंस्कृत , समृद्ध जीवनासाठी प्रयत्नपूर्वक सावली देणाऱ्या आपल्या सारख्या शिक्षकांमुळे सकारात्मक बदल निश्चित मिळेल यात शंका नाही. शिक्षण हाच विकास मंत्र आहे. म्हणून आपला आदर्श शिक्षक गुण गौरव पुरस्कार देताना आनंद ,अभिमान वाटतो. माननीय विलास जगधने सर गौतम विद्यालय पंढरपूर येथे सह शिक्षक म्हणून 38 वर्ष सेवा करून आत्तापर्यंत शिक्षक, डॉक्टर वकील , प्रशासकीय अधिकारी ज्ञान देऊन घडविले आहेत. यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या वतीने ही सन्मान गौरव करण्यात आला. 

यावेळी सामाजिक ,धार्मिक, शैक्षणिक, राजकीय  क्षेत्रातील व्यक्ती, नागरिक व मित्रपरिवार आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा