Breaking News

०९ फेब्रुवारी २०२४

महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना( एकनाथ शिंदे) यांच्यातर्फे निरा नरसिंहपुर मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

 

निरा नरसिंहपुर :दिनांक- 9, प्रतिनिधी:डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.

         महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय व लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना (एकनाथ शिंदे )यांच्या वतीने "हर घर शिवसेना" या मोहिमेचा शुभारंभ निरा नरसिंहपुर येथून करण्यात आला. नीरा नरसिंहपुर येथील नरसिंहाच्या मंदिरामध्ये बहुसंख्येने युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते .सर्वांनी नरसिंह मंदिरात अभिषेक केला आणि एकनाथजी शिंदे साहेब यांच्या निरोगी, सुदृढ व छान आयुष्यासाठी प्रार्थना केली व पुन्हा महाराष्ट्राला हेच मुख्यमंत्री लाभावे अशी प्रार्थना केली.

           या कार्यक्रमासाठी बारामती लोकसभा महिला संपर्कप्रमुख एडवोकेट गीतांजली ढोणे, पुणे जिल्हा महिला प्रमुख सीमा प्रशांत कल्याणकर, पुणे जिल्हा प्रमुख दिग्विजय जगताप ,इंदापूर तालुका महिला प्रमुख रूपाली रासकर, बारामती तालुकाप्रमुख स्वप्निल जगताप, मिलिंद साबळे, हनुमंत देवकर ,रूपचंद बापू, इंदापूर युवासेना प्रमुख अण्णासाहेब काळे, निरा नरसिंहपुर गावचे सरपंच अर्चना सरवदे,  नितीन सरवदे,  उपसरपंच पप्पू गोसावी ,विजय सरवदे ,धनंजय पवार, नाना काळे, मायाप्पा घोडके ,दत्तात्रय कोळी, अनघा कोळी ,विठ्ठल धोत्रे ,सचिन कदम ,दिगंबर डिंगरे,  प्रमोद दंडवते, सागर काकडे, बबलू गोसावी ,गणेश जगदाळे, पप्पू काळे ,देवाभाऊ सरवदे ,शंकर राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

            निरा नरसिंहपुर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुलांना पेन व वह्यांचे वाटप केले. यावेळी विविध मान्यवरांची भाषणे झाली. शिवसेना (एकनाथ शिंदे) नेत्या एडवोकेट गीतांजली ढोणे म्हणाल्या की समाजामधील कोणत्याही व्यक्तीला कशाचीही आणि कुठलीही अडचण असेल तर आम्ही ती सोडवण्याचा प्रयत्न करेल. एकनाथजी शिंदे साहेब हे आरोग्य दूत आहेत आणि आपण आपल्या अडचणी सांगाव्यात असे म्हटल्यावर निरा नरसिंहपुर ग्रामस्थांनी प्रलंबित गावठाण हद्द वाढीचा तसेच गायरान जमिनीवर राहत असलेल्या नीरा नरसिंहपुर मधील जागे अभावी प्रलंबित 100 ते 150 कुटुंबियांना राहत असलेल्या गायरान जागेवरती घरकुल बांधण्यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे रखडलेल्या विकास कामांविषयी संबंधित खात्याकडे चौकशी करून पाठपुरावा केला जाईल असेही सांगितले.

      कार्यक्रमाच्या शेवटी अण्णासाहेब काळे यांनी सांगितले की एकनाथजी शिंदे यांच्या पावलावर पाऊल टाकत पुणे जिल्ह्यातील शिवसेना फक्त आणि फक्त लोकांच्या अडचणी दूर करणार आहे आणि "हर घर शिवसेना" या मोहिमेच्या शुभारंभ हा नरसिंहपूर गावातील अनेक वर्षांपूर्वीपासून प्रलंबित गावठाण हद्दी वाढीचा प्रश्न व प्रलंबित 100 ते 150 घरकुलाच्या जागेचा प्रश्न सोडवणार आहे व त्यासाठी लवकरच एकनाथजी शिंदे यांच्याशी व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. इंदापूर तालुक्यामध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे) यांचे काम हे अतिशय उत्कृष्ट आहे व इथून पुढेही गोरगरीब,  निराधार व मजूर ,शेतकरी या लोकांसाठी आपण विविध प्रकारची मोफत शिबिरे आयोजित करणार आहोत व या मोफत शिबिरांमार्फत गरजू लोकांना मदत करणार आहोत असे पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सीमा प्रशांत कल्याणकर यांनी सांगितले.

        सर्व शिवसेना नेते , पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ यांनी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रमाची सांगता केली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा