Breaking News

०८ फेब्रुवारी २०२४

बारामतीत माता रमाई जयंती उत्साहात साजरी..


 प्रतिनिधी - संतोष कदम.

बारामती :-  दि.७: येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीने आयोजित केलेली त्यागमूर्ती महामाता रमाई यांची जयंती विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी मान्यवरांच्या हस्ते महामाता रमाई यांच्या प्रतिमेस आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.


यावेळी बोलताना माजी नगरसेवक प्रा.रमेश मोरे,शुभम अहिवळे,किरण भोसले यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षमय जीवनप्रवासात माता रमाई यांनी बाबासाहेबांना खंबीरपणे दिलेल्या साथीचे आणि माता रमाई यांच्या त्यागाचे आणि बलिदानाचे स्मरण केले.या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष भारत अहिवळे,विजय खरात,गोरख कांबळे,ॲड.किशोर मोरे,नामदेव शिंदे,सुरज शिंदे,मनोज केंगार,रितेश गायकवाड,अक्षय खरात,अनुप मोरे,विजय साबळे माजी नगरसेविका अनिता जगताप,अनिता शेलार,ज्योती गायकवाड,पूजा लोंढे व आदी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे आयोजन समितीचे सदस्य गौतम शिंदे,बबलू जगताप,विश्वास लोंढे,सोमनाथ रणदिवे,चंद्रकांत भोसले,कैलास शिंदे,चेतन साबळे,सचिन काकडे,नितीन गव्हाळे यांनी केले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा