Breaking News

उदनवाडी चे सुपुत्र अशोक आलदर यांना जीवनगौरव राज्यस्तरीय पुरस्कार....


 

सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:

उदनवाडी तालुका सांगोला येथील सुपुत्र श्री अशोक आलदर यांना नुकताच श्री स्वामी समर्थ जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे

राज्यातून अनेक प्रस्ताव प्राप्त झाले होते त्यामधुन समितीने 22 जणांचे जीवन गौरव पुरस्कार साठी शिफारस केली होती श्री अशोक आलदर हे महावितरण मध्ये नोकरी करत  असून त्यामध्ये श्री अशोक आलदर यांचे सामाजिक कार्य पाहता त्यांना या अगोदरही महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार व महाराष्ट्रातील अनेक संस्थांचे वेगवेगळे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत

तसेच महाराष्ट्रातील अनेक संघटनांच्या पदावरतीही कार्यरत आहेत त्यांचे कार्य पाहता आताही त्यांना स्वामी समर्थ  जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांना सांगोला तालुक्याचे आमदार मा शहाजी बापू पाटील दामाजी कारखान्याचे चेअरमन मा शिवानंद पाटील सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मा सौ जयमालाताई गायकवाड व पंढरपूरचे युवा नेते प्रवण मुखर्जी यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला 

यावेळी सोलापूर जिल्हा परिषदचे माजी शिक्षणाधिकारी मा जितेंद्र खंडाळे साहेब प्राध्यापक नाथाजी चौगुले नगरसेवक गुरुदास अभ्यंकर तसेच स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुवर्णाताई खंडागळे सचिव मा संकेत खंडागळे इत्यादी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत