विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.
कुर्डूवाडी :- दि.9/2/24 विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ कुर्डूवाडी यांच्यावतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंतीच्या निमित्ताने सालाबाद प्रमाणे या बैठकीचे नियोजन आयोजन करण्यात आले होते.
प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक धम्म वंदना घेतली. या बैठकीत भव्य मिरवणूक काढणे ,सांस्कृतिक कार्यक्रम करणे, वर्गणी व मागील वर्षाचा जमा खर्च आढावा या विविध विषयावरती साधक बाधक चर्चा करून नवीन कार्यकारणी निवड जाहीर करण्यात आली. यावेळी RPI महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व विद्यमान नगरसेवक बापूसाहेब जगताप यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर कार्याध्यक्षपदी अमर कुमार माने माजी नगरसेवक यांची निवड सर्वानुमते बिनविरोध व एकमताने करण्यात आली. कुर्डूवाडी शहरातील विविध जयंती मंडळे ही महापुरुषाच्या जीवनावरील देखावे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा गौरव करणारे देखावे, लेझिम , डी. जे.पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने मिरवणुकीत बहुजन समाज, भीमसैनिक अनुयायी, नागरीक बालक पालक सहभागी होत असतात. सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ही जयंती मानली जाते. मागील 49 वर्षापासून कुर्डूवाडी शहरात जयंती साजरी होत आहे. मध्यवर्ती जयंती मंडळाची नूतन कार्यकरणी पुढील प्रमाणे.. अध्यक्ष बापूसाहेब जगताप, कार्याध्यक्ष अमर कुमार माने, उपाध्यक्ष चंद्रकांत वाघमारे, ॲड. हरीशचंद्र कांबळे, राजू दनाने आकाश जगताप , समद मुलाणी, सुहास शेंडगे, नितीन जानराव, सिद्धार्थ झिंगळे बाळासाहेब शेंडगे, मोरे सचिव रामभाऊ जगताप, सहसचिव आशिष रजपूत, खजिनदार अमोल रजपूत, भीमसेन मिसाळ, मार्गदर्शक प्रा. रवींद्र ननवरे, महेंद्र जगताप, पत्रकार सुनील चांदणे, राजकुमार वजाळे, जगदीश झिंगळे तसेच अशा विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. या कार्यक्रमास उपस्थिती माजी नगराध्यक्ष बापू शिरसागर, माजी उपसरपंच बंडू भोसले, नितीन कांबळे, अमर जगताप, शिवाजी डांगे बलभीम शिवशरण, वीरेंद्र कांबळे, संजय कांबळे, संजय तुपारे, दशरथ कांबळे, संतोष माने, गणेश समदाडे, शुभम माने, कुर्डूवाडी शहरातील जयंती मंडळाचे सर्व अध्यक्ष व पदाधिकारी तसेच भीमसैनिक, कार्यकर्ते नागरिक या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन गाडे यांनी केले . तर आभार प्रवीण जगताप यांनी मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा