Breaking News

१८ ऑक्टोबर २०२३

पायोनियर स्कूल य. मंगेवाडी चा विद्यार्थी विघ्नेश शेंबडे याचा वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक...




सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:

          नवरात्र निमित्त आयोजित नाझरा येथे आयोजित नाझरा फेस्टिव्हलमध्ये वकृत्व स्पर्धेत पायोनियर इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये इयत्ता ६ वी मध्ये शिकणारा विघ्नेश समाधान शेंबडे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळविला.

        नाझरा येथे नवरात्र निमित्त नाझरा फेस्टीवलच्या  माध्यमातून विविध सांस्कृतिक उपक्रम आयोजित करून आपल्या भारतीय संस्कृतीचे जतन करण्यात येते.

   काल झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत पायोनियर स्कूलचा विद्यार्थी विघ्नेश समाधान शेंबडे याने प्रथम क्रमांक मिळविल्या बद्दल त्याचे व पायोनियर शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे. विघ्नेशच्या यशात शिक्षकांबरोबरच त्याच्या आई वडिलांचे देखील बहुमोल योगदान आहे.

        पायोनियर इंग्लिश मिडीयम स्कूल नेहमीच विद्यार्थांच्या कलागुणांना वाव देवून त्यांचा सर्वांगीण विकास साधत असते.प्राचार्य अनिल येलपले सर व सर्व विभागप्रमुख आणि शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पायोनियर चे विद्यार्थी सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा