Breaking News

१६ ऑक्टोबर २०२३

अजनाळे ग्रामपंचायतीच्या वतीने धूर फवारणी


 अजनाळे: सचिन धांडोरे: डेंग्यु आणि डेंग्युसदृश्य आजारांच्या साथीने तालुक्यात थैमान घातले आहे. अजनाळे ग्रामपंचायतीने प्रतिबंधकत्मक उपाय म्हणुन गावात धुर फवारणी करण्यात आली.

डेंगू हा अत्यंत भयानक आजार आहे त्यामुळे ग्रामपंचायत वतिने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून धूर फवारणी केली आहे. डेंगू सदृश्य रोगासह डासांपासून होणाऱ्या सर्वच रोगावर नागरिकांमध्ये जनजागृती करणार असल्याचे कर्तव्यदक्ष ग्रामसेवक संदीप सरगर यांनीसांगितले.नागरीकांनी डेंगूसदृश्य रोगाची लागण होऊ नये म्हणून आपल्या घरातील व घरासमोरील स्वच्छता ठेवणे काळाची गरजेचे आहे.फुटके टायर,बाटल्या, टाक्या यामध्ये पाणी साठु न देणे त्यासाठी आठवड्यातुन  एक दिवस कोरडा पाळला पाहिजे.  नागरिकांनी डेंग्यु सदृश्य परिस्थिती येऊ नये म्हणुन काळजी घ्यावी असे आवाहन कर्तव्यदक्ष ग्रामसेवक संदीप सरगर यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा