Breaking News

१४ ऑक्टोबर २०२३

वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रुपचंद गाडेकर यांची निवड...


 विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.

औरंगाबाद :-  वंचित बहुजन आघाडीची औरंगाबाद पच्श्रिम विभागांची पुर्णगठीत कार्यकारणी आज वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी जाहीर केली आहे यांत दुसर्यांदा पक्षाने रुपचंद लक्ष्मण गाडेकर यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची जिल्हा उपाध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे.

 नियुक्ती बद्दल वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष व प्रवक्ते सिध्दार्थ मोकळे, वंचित बहुजन महिला आघाडीच्या राज्य महासचिव तथा औरंगाबाद जिल्हा प्रभारी अरुंधती ताई शिरसाट,युवा राज्य कार्यकारिणी सदस्य अमित भूईगळ, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील, मराठवाडा कार्यक्रम प्रमुख जितेंद्र शिरसाठ, मराठवाडा मुख्य संघटक महेश निनाळे, मराठवाडा सचिव तय्यब जफर, पुर्व जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले,युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, पच्श्रिम शहराध्यक्ष संदीप शिरसाट,औरंगाबाद महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड लताताई बामण, युवा शहराध्यक्ष मध्य संदीप जाधव,औरंगाबाद पच्श्रिम तालुकाध्यक्ष अंजन साळवे, माजी जिल्हा सचिव संदीप गायकवाड,गंगापूर तालुका महासचिव बाबासाहेब दुशिग, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा रत्नमाला पवार,गंगापूर तालुका महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा जयाताई सदावर्ते, महिला आघाडीच्या तालुका कार्यकारिणी सदस्य निर्मला शेजवळ, वैजापूर तालुक्यातील पेडाफळ ग्रामपंचायत सदस्य मनोज पठारे, राहुल मुगदल, ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर दाणे,दिलीप आरक,सईद बाबा पठाण, अमोल जाधव, संतोष जमधडे,कान्हू भालेराव, सचिन भुजंग, आदींनी अभिनंदन केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा