विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.
औरंगाबाद :- वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते व उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांची अँड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पक्षाच्या मीडिया विभाग प्रमुख पदी निवड केली असून केंद्रीय, राज्य,विभागीय,जिल्हा आणि स्थानिक कार्यकारिणीच्या माध्यमातून पक्षांचे माध्यमं व्यवस्थापन करण्याची व पक्षाचे कार्यक्रम व ध्येय धोरणांची व्यापक प्रसिद्धी करण्याची जबाबदारी अँड .बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्यावर सोपवली आहे असे पत्र नियुक्तीचे अँड .बाळासाहेब आंबेडकर यांनी काढले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्ते पदांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून पक्षाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीची भुमिका राज्यातील गाव खेड्यांपर्यंत पोहचविण्यात सिध्दार्थ मोकळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे .ते औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील भुमिपुत्र आहेत त्या निमित्त आज सुभेदारी शासकीय विश्रामगृह औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला .
या प्रसंगी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड .लताताई बामणे, वंचित बहुजन आघाडीचे पच्श्रिम जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, पच्श्रिम जिल्हा महासचिव पंकज बनसोडे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख भाऊराव गवई, स्टार प्रचारक मेघानंद जाधव, जिल्हा सचिव संदीप जाधव, सागर मोरे, रविरत्नपारखे, ऋषिकेश गायकवाड, सागर धोडपकर,आदी कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा