Breaking News

३० सप्टेंबर २०२३

अजनाळे- कमलापूर रस्त्याची लागली वाट; झोपलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग कधी येणार?..


 
अजनाळे:सचिन धांडोरे 

अजनाळे- कमलापुर रसत्याची अंत्यत दयनीय अवस्था झाली असुन सर्वाजनिक बांधकाम विभागाणे काही दिवसापूर्वी या रसत्यावरील काही ठिकाणचे खड्डे भुजवुन मलमपट्टी करण्यात आली होती.संबधित ठेकेदाराने अतिशय निकृष्ट दर्जाच्या केलेल्या कामामुळे काही महिन्यातच या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून हा रस्ता कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीने दुरुस्त करावा अशी मागणी  ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत चंदनशिवे यांनी केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अजनाळे ग्रामपंचायतीने अनेक वेळा लेखी अर्ज देऊन हा रस्ता दुरुस्त करण्यासंदर्भात वेळोवेळी मागणी करून सुद्धा झोपलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केले आहे.अजनाळे - कमलापुर या रसत्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुक असल्यामुळे वाहनधारकास वाहतुकीस अडचण निर्माण होत आहे.या  रस्त्यावर थोडा जरी पाऊस पडला तरी या रसत्यावरील  खड्ड्यामध्ये पाणी साचत खड्ड्यांचा अंदाज न अल्यामुळे परिणामी या रस्त्यावर छोटे मोठे अपघात घडले आहेत.

डाळिंबाचा कॅलिफोर्निया म्हणून जगप्रसिद्ध नाव मिळवलेल्या अजनाळे गावाला जाण्यासाठी डांबरीकरण रसत्यावर कमलापुर ग्रामपंचायतच्या नजीकच भले मोठे खड्डे पडल्यामुळे हा  वाहतुकीस अडचण निर्माण करत आहे.तरी  झोपेचे सोंग घेतलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळिच हा रस्ता दुरुस्त करावा अन्यथा डांबरीकरण रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करण्याचा इशारा चंद्रकांत चंदनशिवे यांनी दिला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा