मंगळवेढा प्रतिनिधी : येताळा खरबडे
आज दिनांक 22/9/2023 रोजी भीमनगर मंगळवेढा येथील स्मशानभूमी रोड खवतोडे गल्ली शेजारील मंगळवेढा नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या महिलांचे व पुरुषांचे सार्वजनिक शौचालय अतिशय निकृष्ट स्थितीत असून सदर शौचालय वृद्ध महिला, पुरुष व लहान मुले वापर करतात. यापूर्वी मंगळवेढा तालुक्यामध्ये अशा धोकादायक शौचालयाची स्वच्छता करण्यासाठी गेलेल्या सफाई कर्मचारी यांचा शौचालयच्या टाकीमध्ये पडून टाकीमधील गॅसमुळे मृत्यू झाला होता.
भिमनगर मधील दोन्हीही शौचालये ही अतिशय निकृष्ट असून पडण्याच्या स्थितीत आहेत, त्यामुळे कोणत्याही प्रकारची दुर्दैव घटना घडण्याची शक्यता आहे, तरी अशा प्रकारचा कोणताही अनुचित प्रकार घडू नये,याची नगरपरिषदेने लवकरात लवकर दखल घेऊन योग्य ती उपायोजना करावी. अशा प्रकारचा कोणताही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याधिकारी या नात्याने आपली राहील. म्हणून आपणास विनंती आहे की येणाऱ्या दहा दिवसांमध्ये आपण याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून दोन्ही शौचालय दुरुस्ती अथवा नवीन बांधण्यासाठीच्या कामाची आपल्या स्तरावर त्वरित मंजुरी घ्यावी. अन्यथा या निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन वंचित बहुजन आघाडी मंगळवेढा च्या वतीने नगरपरिषद मंगळवेढा कार्यालयाच्या दालनासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल,याची नोंद असावी.
यावेळी तालुकाध्यक्ष अशोक माने, जिल्हा संघटक वैभव भंडारे, शहर अध्यक्ष श्रीकांत कांबळे, शहर महासचिव अजय गाडे,शहर उपाध्यक्ष मेकांपा मोरे, माजी शहराध्यक्ष सोमनाथ ढावरे,ता. संघटक पुष्पक सोनवले,लखन शिकतोडे,ता.प्रसिद्धीप्रमुख अंकुश शेवडे,तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, सतीश लोकरे, महेंद्र ससाणे,अतुल खरबडे सर,दत्ता अवघडे, वसंत माने, अनिकेत खरबडे,रतन मोरे,रमा मस्के,कमल मस्के,विष्णू लोखंडे, विठ्ठल मोरे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या या निवेदनावर सह्या आहेत..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा