इंदापूर:- विशेष प्रतिनिधी, माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा नागरिकांना हक्क प्रदान करणारा महत्वपूर्ण कायदा असून या कायद्याचा प्रचार व प्रसार करणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे. तसेच या कायद्याचे महत्व व उपयोगिता सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच सामान्य नागरिक यांना व्हावी म्हणून शासकीय आस्थापना म्हणून आपली जबाबदारी आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने २८ सप्टेंबर हा दिवस महाराष्ट्र शासन अधिनिस्त प्रत्येक सरकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करावा
असे सामाजिक कार्यकर्ते भिमसेन सर्जेराव उबाळे, वालचंदनगर, यांचे इंदापूर तालुक्यातील शासकीय कार्यालयांना निवेदन आज दि 20-09-2023 रोजी सादर केले.
माहिती अधिकार अधिनियम कलम २६ (१) (ख) खंड (क) अन्वये माहिती अधिकार अधिनियमाबाबत सर्वसामान्य लोकांमध्ये जनजागृती होणे साठी दरवर्षी २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. माहिती अधिकार प्रक्रिया तातडीची व सुटसुटीत असावी यासाठी अपिलार्थी सुध्दा जागरुक असणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या स्तरावर माहिती अधिकाराबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे.
त्यानुसार आपल्या कार्यालयाकडून तसेच आपल्या अधिनस्त कार्यालयाकडून सामान्य जनतेस तसेच माहिती अधिकारात कार्य करीत असलेले कार्यकर्ता यांना माहिती मागण्याची पध्दती आणि शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना माहिती देण्याची पध्दती याविषयी जागरुक करणे गरजेचे आहे. माहिती अधिकार दिनानिमित्त आपल्या कार्यालयामार्फत माहिती अधिकार अधिनियम कायद्याच्या जागृतीविषयी कार्यक्रम आयोजित करून माहिती अधिकार दिन साजरा करण्यात यावा तसेच आपल्या अधिनस्त कार्यालयात येणारे शाळा, महाविद्यालये येथे देखील विद्यार्थ्यांच्या जनजागृती साठी कार्यक्रम आयोजित करण्याबाबत संबंधीत शाळा, महाविद्यालये यांना
अवगत करावे, या शिवाय माहिती अधिकार अधिनियम २००५ चे कलम ४ अंतर्गत आपल्या कार्यालयाचे जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांची नावे व पदनाम दर्शविणारे फलक लावणे आवश्यक आहे. मात्र सदर फलक एकदा लावल्यानंतर वेळोवेळी अद्यावत केले जात नाही असे निदर्शनास आले आहे. सदर फल्लक वेळोवेळी अद्यावत केले जावे, त्याचबरोबर माहिती अधिकार अर्जावर अपिलार्थी यानी आपला भ्रमणध्वनी, ई-मेल आयडी टाकावे अशी सूचना करावी तसेच माहितीचा अर्ज भरणेबाबत अपिलार्थीस सुलभ होईल अशा मागर्दशनपर सूचना कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावाव्यात.
या वर्षी २८ सप्टेंबर २०२३ या दिवशी अनंत चतुर्दशी तसेच ईद ए मिलाद या सणाची सुट्टी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे २८ सप्टेंबर २०२३ या दिवशी शक्य नसल्यास सदर माहिती अधिकार दिन हा २७ सप्टेंबर २०२३ या दिवशी किवा २९ सप्टेंबर २०२३ या दिवशी साजरा करावा तसेच तशा सूचना आपल्या अधिनिस्त सर्व शासकीय कार्यालयांना तातडीने कराव्यात.
संबंधीत तहसिल कार्यालय नायब तहसीलदार श्री मयुर बनसोडे व प्रभारी गटविकास अधिकारी श्री संजय जगताप , पंचायत समिती इंदापूर यांनी आपल्या खात्यातील इंदापूरचे सर्व अधीनस्त कार्यालयांना तशा सुचना तात्काळ केलेल्या आहेत असे सामाजिक कार्यकर्ता भिमसेन सर्जेराव उबाळे यांना आश्वासित केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा