Breaking News

अजनाळे येथे ज्वारीचे बियाणे वाटप


 अजनाळे: राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेतंर्गत फुले सुचित्रा या सुधारीत वाणाचे रब्बी ज्वारी प्रकल्पातील बियाणे काल  शुक्रवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय अजनाळे येथे वाटप करण्यात आले असल्याची माहिती कृषी सहाय्यक विवेक पाटील यांनी दिली. 

याप्रसंगी मधुकर पाटील, ज्ञानदेव देशमुख,शामराव कोळवले,एकनाथ भंडगे,मालन धांडोरे, सुनंदा धांडोरे, विलास कोळवले,विनायक शेंबडे, शरद कोळवले,कैलास कुरे यांच्यासह अन्य शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

 यावेळी कृषी सहाय्यक विवेक पाटील यांनी बियाणे पेरणी करताना घ्यावयाची काळजी जसे की जमिनीची मशागत, पेरणीची खोली, बीजप्रक्रिया, शेणखत व रासायनिक खतांचा सुयोग्य वापर, पाण्याचे व्यवस्थापन व उत्पादन वाढीसाठी करावयाचे उपाय याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी ज्वारी उत्पादक शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बियाणे वाटपाचा लाभ घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत